ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

पुणे जिल्हा परिषदेत ‘राष्ट्रवादी’ची घड्याळ जोरात:एकहाती सत्ता मिळणार? काँग्रेसला शून्य जागा मिळण्याचा अंदाज, ‘प्राब’चा दावा

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पश्चात पुणे जिल्हा परिषदेत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला एकहाती सत्ता मिळणार असल्याचा दावा ‘पॉलिटिकल रिसर्च अँड अॅनालिसिस ब्युरो’ने (प्राब) आपल्या एक्झिट पोलमध्ये केला आहे. अजित पवार यांचे गत 28 जानेवारी रोजी एका विमान अपघातात निधन झाले. ते पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रचारासाठी बारामतीत येत असताना ही दुर्घटना घडली होती. त्यांच्या दुःखद निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीच्या प्रचाराला फूलस्टॉप दिला. त्यानंतर काल झालेल्या निवडणुकीत पुणे जिल्ह्यात सरासरी 69 टक्के मतदान झाले. यात बारामतीत अवघे 54 टक्के मतदान झाले. त्यानंतर आता 9 तारखेला निकाल जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्राबने आपल्या एक्झिटपोलमध्ये पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. एक्झिट पोलचा अंदाज काय? ‘प्राब’च्या एक्झिट पोलनुसार, 73 सदस्यीय पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला सर्वाधिक 47 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर 18 जागांसह भाजप दुसऱ्या क्रमांकावर राहण्याचा अंदाज आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेला 6, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एका ठिकाणी विजय मिळू शकतो. धक्कादायक बाब म्हणजे काँग्रेसला या निवडणुकीत भोपळाही फोडता येणार नाही. एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून येईल, असा अंदाजही या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीची होती युती राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी पुणे महापालिकेनंतर जिल्हा परिषदेची निवडणूकही एकत्र लढली होती. अजित पवार यांच्या नेतृत्वातच हे दोन्ही गट एकत्र आले होते. राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार घड्याळ एका एकाच चिन्हावर लढले होते. या सर्व उमेदवारांची जबाबदारीही अजित पवारांनी घेतल्याची माहिती होती. अजित पवारांच्या या पुढाकारामुळे दोन्ही राष्ट्रवादींनी एकदिलाने प्रचार सुरू केला होता. पण अजित पवारांच्या अनपेक्षित निधनामुळे या दोन्ही पक्षांना जोरदार झटका बसला. कुठे किती झाले मतदान?

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर