ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

रोहित पवारांचे CID च्या रिकाम्या खुर्चीला निवेदन:रिकाम्या खुर्चीलाच जबाब नोंदवून घेण्याची मागणी; अघोरी पूजेविषयी बारामतीच्या नेत्याचा उल्लेख

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूविषयी येथील सीआयडी कार्यालयाला भेट दिली. यावेळी कार्यालयात एकही जबाबदार अधिकारी नसल्यामुळे त्यांनी रिकाम्या खुर्चीला निवेदन देऊन बीएनएसएस कलम 180 अंतर्गत आपला जबाब नोंदवण्याची विनंती केली. त्यांच्या या गांधीगिरीची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे. दरम्यान, रोहित पवार यांनी यावेळी भोंदू अशोक खरातच्या सल्ल्यानुसार, अजित पवार गटाच्या बारामती येथील एका नेत्याने अजित पवारांच्या काटेवाडी येथील घराबाहेर पूजा केल्याचाही आरोप केला. अजित पवार यांचा गत 28 जानेवारी रोजी बारामतीत झालेल्या एका विमान अपघातात मृत्यू झाला होता. आज या घटनेला 3 महिने पूर्ण झाले. या निमित्ताने रोहित पवार आज CID अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. पण त्यांना कार्यालयात एकही जबाबदार अधिकारी आढळला नाही. त्यावर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीलाच निवेदन देऊन आपला जबाब नोंदवण्याची मागणी केली. काय म्हणाले रोहित पवार? रोहित पवार म्हणाले, अजितदादांच्या विमान अपघाताचा तपास CID कडं असल्याने या अपघाताला 3 महिने पूर्ण झाल्यानिमित्त आज अपघाताच्या तपासाबाबत माहिती घेण्यासाठी आणि आमच्याकडील माहिती देण्यासाठी CID कार्यालयात गेलो असता तिथं एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हता. यापूर्वी पहिल्या भेटीत तीन अधिकारी, दुसऱ्या भेटीत एक अधिकारी उपस्थित होते, तर आजच्या तिसऱ्या भेटीत एकही अधिकारी उपस्थित नव्हता. कदाचित पुढील वेळेस आम्हाला गेटवरच कागदपत्रे दाखल करावी लागतात की काय, अशी शंका येते. यावरुन CID ला खरंच या गुन्ह्याचं गांभीर्य आहे का आणि या अपघाताचा तपास खरंच निष्पक्षपणे होऊन अजितदादांना न्याय मिळेल का, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. अजितदादांसारख्या उपमुख्यमंत्रीपद सांभाळलेल्या नेत्याच्या बाबतीत घडणारी ही बाब अत्यंत निराशाजनक आहे. पण CID कार्यालयात अधिकारी जरी उपस्थित नसले तरी तेथील प्रातिनिधिक रिकाम्या खुर्चीला आम्ही निवेदन सादर केलं. तसंच अजितदादांच्या अपघाताचा तपास हा तांत्रिक मुद्द्यांसोबतच गुन्हेगारी अनुषंगानेही वेगाने करण्याची आणि माझं हे निवेदन BNSS 2023 च्या कलम 180 अंतर्गत माझा जबाब म्हणून नोंदवून घेण्याचीही मागणी आम्ही रिकाम्या खुर्चीकडे केली, असे ते म्हणाले. भोंदू खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीच्या नेत्याने केली अजितदादांच्या घराबाहेर पूजा रोहित पवार यांनी यावेळी भोंदू अशोक खरातच्या सल्ल्यानुसार सत्ताधारी राष्ट्रवादीच्या एका नेत्याने बारामतीत अजित पवारांच्या घराबाहेर पूजा केल्याचाही आरोप केला. ते म्हणाले, अजित पवारांच्या काटेवाडी येथील घरालगतच्या शेतात एक विहीर आहे. या विहिरीजवळील एका झाडाला 28 तारखेपूर्वी एक बकरी मारून टांगली होती. तसेच तिथे एक पूजाही करण्यात आली होती. आता तिथे फक्त बकरीची हाडे व काही मांस शिल्लक आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार बारामती येथील एक छोटा नेता आहे. हा नेता अशोक खरातच्या सातत्याने संपर्कात होता. तसेच अजितदादांच्या पक्षातील जे नेते खरातच्या संपर्कात होते, त्या लोकांसोबत या नेत्याचे आर्थिक संबंध आहेत. काटेवाडी येथील घरात काम करणाऱ्या कामगारांचे पगार देण्यात या नेत्याचा सहभाग असल्याची माहिती आहे. याच नेत्याच्या माध्यमातून अजितदादांच्या काटेवाडी येथील घराची व सहयोग येथील घराची पूजा करण्यात आली होती. आमचा काळ्या जादूवर विश्वास नाही. आमचा भोंदूगिरीवरही विश्वास नाही. पण या मागचा हेतू काय होता? दादांच्या काटेवाडी येथील घर, सहयोगमधील घर व देवगिरी बंगल्याबाहेर अशा प्रकारच्या पूजा का झाल्या? मग खरातच्या खात्यात 27, 28 व 29 जानेवारी रोजी उलाढाल का वाढली? असा सवाल रोहित पवार यांनी यावेळी उपस्थित केला. अशोक खरातला 26-27 जानेवारी रोजी एक शेतकरी भेटला होता. त्याने पवार कुटुंबावर असलेल्या प्रेमापोटी खरातला पवार कुटुंबातील सर्वकाही नीट होईल का असा प्रश्न केला होता. त्यावर खरातने सांगितले की, पुढच्या काही दिवसांमध्ये पवार कुटुंबावर मोठा आघात होईल किंवा अडचण निर्माण होईल. आता या सर्व प्रकरणाची सीआयडीने चौकशी करावी, असे रोहित पवार म्हणाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर