ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

विदर्भातील शाळा आता 30 जूनलाच सुरू होणार:उच्च न्यायालयाचा निर्णय, नागपूर खंडपीठाने अधिकाऱ्यांना खडसावले

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शिक्षण विभागाचे 28 मार्च व 9 जूनचे आदेश रद्द केल्यामुळे विदर्भातील शाळा आता 30 जून रोजीच सुरू होणार आहेत. शिक्षण विभागाने 28 मार्च रोजी विदर्भासह राज्यातील सर्व शाळा 15 जून पासून सुरू करण्याचे निर्देश दिले होते, मात्र त्यास विदर्भातील शिक्षक संघटना व पालकांनी तीव्र विरोध केला होता. 15 जून रोजी विदर्भातील तापमान पुरेसे कमी होत नसल्याचे आणि या भागासाठी आधीपासूनच 26 जूनची तारीख निश्चित असल्याचे कारण पुढे करत काही संघटना थेट नागपूर खंडपीठात गेल्या होत्या, आणि अखेर न्यायालयाने शिक्षण विभागाचे आदेश रद्द करत विदर्भातील शाळांसाठी 30 जूनची तारीख कायम केली आहे. 9 जून रोजी शिक्षण विभागाने सुधारित आदेश काढत विदर्भातील शाळा 22 जूनपासून सुरू होतील आणि 22 ते 30 जून दरम्यान सकाळच्या सत्रात शाळा भरवल्या जातील, असे जाहीर केले होते. मात्र आज नागपूर खंडपीठात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने शिक्षण विभागाला कडक शब्दांत सुनावले. विदर्भातील शाळांसाठी आधीच 26 जूनची तारीख निश्चित असताना वारंवार नवनवे आदेश काढून गोंधळ का निर्माण केला जातो, असे खंडपीठाने स्पष्टपणे खडसावले. अखेर नागपूर खंडपीठाने विदर्भातील शाळांसाठी 30 जून ही तारीख निश्चित करताना, शिक्षण विभाग व त्यांच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वीच्या शासन निर्णयाविरोधात जाऊन कोणतीही कृती करू नये, असे स्पष्ट निर्देशही दिले आहेत. विदर्भातील तापमानाचा संभाव्य धोका विचारात घेऊन उन्हाळी सुट्टी आणि शाळा सुरू करण्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून, 30 जून 2026 पर्यंत विदर्भातील सर्व शाळा सकाळच्या सत्रातच भरवल्या जाणार आहेत. त्यानंतर 1 जुलै 2026 पासून शाळा नियमित वेळेत सुरू होतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर आणि प्राथमिक शिक्षण संचालक डॉ. शरद गोसावी यांनी संयुक्तपणे हे परिपत्रक जारी केले आहे. विदर्भात मान्सून दाखल होण्यास अद्याप काही दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने तापमान विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा 30 जूनपासूनच सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर