ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र अडीच वर्षे मागे गेला:ते अडीच वर्षे घरी बसले हे राऊत अभिमानाने सांगतात- नवनाथ बन

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अडीच वर्षांच्या काळात उद्धव ठाकरे घरी बसले हे संजय राऊत अभिमानाने सांगत आहेत. शरद पवारांनी लिहलेले पुस्तक वाचा, जेव्हा गरज होती त्यावेळी मुख्यमंत्री घरात बसले असा उल्लेख त्यांनी केला आहे आणि उद्धव ठाकरेंच्या कारभारावर टीका केली, असे भाजप्र प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र अडीच वर्षे मागे गेला. महाराष्ट्राचे आतोनात नुकसान झाले हे तुमचेच सहकारी म्हणतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यात विकासाचा वेग कायम ठेवला आहे. मेट्रो, कोस्टल रोड, अटल सेतू, बीडीडी चाळ पुनर्विकास यांसारखे मोठे प्रकल्प प्रत्यक्षात उतरवले. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार ‘स्थगिती सरकार’ म्हणून ओळखले गेले. अमित शहांचा आत्मविश्वास विरुद्ध राऊतांचा भ्रम नवनाथ बन म्हणाले की, अमित शहा यांचा आत्मविश्वास काय आहे हे जनतेने पाहिले आहे. संजय राऊत यांचा काय आत्मविश्वास होता हे जनतेने पाहिले आहे. 25 वर्षे आमचीच सत्ता राहणार. मुंबई मनपावर आमचाच झेंडा फडकेल. तुमच्या आत्मविश्वासाला जनतेने कुलुप लावले आहे. शहा हे जनतेमध्ये असतात त्यांना जनता जाणते, पश्चिम बंगालमध्ये आमचे सरकार येणार आहे. कारण जनतेचा आम्हाला आशीर्वाद आहे. तुमच्या विचारांना तडे गेले नवनाथ बन म्हणाले की, हुतात्मा स्मारकाची डागडुजी करण्याची गरज आहे. ते करण्याचे काम मुंबई मनपा आणि राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच केले जाईल. परंतु संजय राऊत तुमच्या पक्षाच्या विचारांना गेलेल्या तड्यांना डागडुजी करण्याचे काम महाराष्ट्रातील जनतेने केले आहे. तुमची वैचारिक सुंता झाली असून तुमच्या विचारांना तडे गेले आहेत. हिंदूत्ववादी विचार सोडून तुम्ही औरंगजेब आणि अफजल खानाचे विचार सांगण्याचे काम तुम्ही करत आहात. तुम्हाला मुजरे करण्याची सवय नवनाथ बन म्हणाले की, पत्रकार परिषदेमध्ये अदानी आणि अंबानी यांच्यावर टीका करायची आणी त्यांच्या घरी जात मुजरे घालायचे आणि डान्स करण्याची तुम्हाला सवय झाली आहे. मुंबईतील कोणतीही जमीन कोणाला दिली जाणार नाही. कोणाच्या घराबाहेर बॉम्ब ठेवण्यात येणार नाही. तुम्हाला उद्योजकांवर रोष असेल तर उद्धव ठाकरेंना विचारा का त्यांचे स्वागत का केले. डान्स का केला. जमीनी कोणाला देणार नाही हे महाराष्ट्राला माहिती आहे. मोदींचे नेतृत्व सक्षम नवनाथ बन म्हणाले की, युद्धाच्या काळात महागाईची झळ सामान्य माणसांना बसू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत. पाकिस्तानमध्ये जाऊन बघा तिथे 500 रुपये लीटर पेट्रोल झाले आहे. बांगलादेश, श्रीलंकेत काय परिस्थिती आहे बघा. मोदींच्या नेतृत्वात असे भाव झाले नाही, त्याचे कधीतरी कौतुक करा. अडीच वर्षांच्या विलंबाची जबाबदारी टाळू नका नवनाथ बन म्हणाले की, मुंबई–पुणे प्रवासाला गती देणाऱ्या मिसिंग लिंक प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी झालेल्या वाहतूक कोंडीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठेपण दाखवत सार्वजनिकरित्या दिलगिरी व्यक्त केली. पण संजय राऊत आणि उबाठा गटाने आत्मपरीक्षण करायला हवे. कारण या महत्त्वाच्या प्रकल्पाला अडीच वर्षे विलंब झाला, आणि त्याची थेट जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर