ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

पुणे जिल्ह्यातील घटना अत्यंत निंदनीय:प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला मृत्यूदंड होईल याची काळजी घेतली जाईल – CM

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवील यांनी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात एका 4 वर्षीय चिमुकलीवरील बलात्कार व हत्या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. पुणे जिल्ह्यातील घटना घटना अत्यंत निंदनीय व दुःखदायक आहे. या प्रकरणी सर्वांना हळहळ वाटत आहे. सरकार हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपी नराधमाला मृत्यूदंड होईल याची काळजी घेईल, असे ते म्हणालेत. भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका 65 वर्षीय नराधमाने साडेतीन वर्षीय निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली आहे. भिमराव कांबळे असे आरोपीचे नाव आहे. त्याने मृत चिमुकलीला वासरू दाखवण्याचा बहाणा करत गुरांच्या गोठ्याकडे नेले. तिथे तिच्यावर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला. या घटनेमुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. नसरापूर येथे नागरिकांनी पुणे – सातारा महामार्गावर रास्ता रोको करून आपला रोष व्यक्त केला. भोरच्या घटनेमुळे समाजात रोष ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित ‘महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन 2026’ चा भव्य उद्घाटन सोहळा , शनिवार (2 मे) रोजी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एमएमआरडीए मैदानावर पार पडणार आहे पत्रकारांनी आज याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना छेडले असता त्यांनीही या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला. मुख्यमंत्री म्हणाले, पुणे जिल्ह्यातील घटना अत्यंत निंदनीय व दुःखदायक आहे. तीन साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर 65 वर्षांच्या नराधमाने अत्याचार केला व खूनही केला. आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीचे अशा प्रकारचे जुने संदर्भही दिसत आहेत. या घटनेमुळे समाजात रोष निर्माण झाला आहे. सर्वांनाच मुलगी व तिच्या कुटुंबीयांबद्दल हळहळ वाटत आहे. मी आश्वस्त करू इच्छितो की, हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात येईल. या प्रकरणी विशेष फास्टट्रॅक कोर्ट स्थापन करण्यासाठी सरकारतर्फे हायकोर्टाला विनंती केली जाईल. तसेच स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर देऊन कमीत कमी वेळात या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आम्ही कोर्टापुढे करणार आहोत. विरोधकांवर साधला निशाणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी या प्रकरणाचे राजकारण करणाऱ्या विरोधकांनाही चांगलेच फटकारले. हे अत्यंत असंवेदनशील आहेत. प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधून काढणे याहून अधिक वाईट काहीच असू शकत नाही. काही गोष्टीत तरी संवेदना पाळली पाहिजे. त्यांनी काही केले तरी हरकत नाही. पण राज्य सरकार जे करायला पाहिजे, ते नक्की करेन, असे ते म्हणाले. मोबाईल अलर्टची टेस्टिंग यशस्वी झाली मुख्यमंत्र्यांनी यावेळी देशभरातील मोबाईल्सवर आपत्कालीन अलर्ट देण्याचा प्रयोग यशस्वी झाल्याचीही घोषणा केली. आज अनेक मोबाईलवर अलर्टचे मेसेज आले. यासंदर्भात यापूर्वीच असा प्रयोग करण्यात येणार असल्याची कल्पना देण्यात आली होती. आपल्या सर्वांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे की, संपूर्ण शुद्ध, भारतीय मेक अशा पद्धतीने ही अलर्ट सिस्टिम तयार झाली आहे. युद्ध, आपत्ती व आणीबाणीच्या काळात प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईलवर त्याच्या भाषेत आता आपल्याला अलर्ट देता येणार आहे. त्याचे टेस्टिंग आज करण्यात आले. हे टेस्टिंग यशस्वी झाले आहे. आपण सर्वांनी पाहिले की, आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलवर एक अलर्ट आला. मेसेज आला. सगळ्या भाषांमध्ये आला. त्यामुळे मला असे वाटते की, भारताने डिजास्टर प्रिपेडनेसमध्ये किंवा युद्धजन्य परिस्थितीमध्ये जी तयारी असायला हवी त्यात अतिशय उत्तम प्रकारची कामगिरी केली आहे, असे फडणवीस म्हणाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर