ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

मुंबईकरांच्या घरांसाठी ‘मास्टर प्लॅन’; प्रभावी वापरासाठी आता नवे धोरण:घरांच्या वाटपातील अडथळे दूर होऊन पारदर्शकता येणार

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची वेगाने कामे सुरू असताना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी उपलब्ध असणाऱ्या “हाउसिंग स्टॉक’चा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. या घरांचा केवळ साठा करून न ठेवता त्यांचा प्रभावी आणि सुनियोजित वापर करण्यासाठी राज्य सरकार लवकरच नवे धोरण आणणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी झालेल्या मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाच्या विशेष आढावा बैठकीत याचे निर्देश दिले. या निर्णयामुळे मुंबईतील रस्ते, मेट्रो आणि अन्य प्रकल्पांमुळे विस्थापित होणाऱ्या कुटुंबांना वेळेत आणि हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. घरांच्या वाटपातील अडथळे दूर होऊन पारदर्शकता येईल. यामुळे सामान्य मुंबईकरांचे पुनर्वसन अधिक सुसह्य होईल. नागरिकांचे पुनर्वसन ही प्राथमिकता पायाभूत प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन ही आपली प्राथमिकता आहे. हाउसिंग स्टॉकचा वापर केवळ तांत्रिक न राहता तो लोकाभिमुख असावा यासाठी प्रभावी धोरण तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. -देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर