ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

जिथे सत्ता, तिथेच नेत्यांचा मुक्काम:जिल्ह्यात बदलत्या सत्तेसोबत बदलत गेले राजकीय रंग‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. जिल्ह्याच्या राजकारणातील एक जुनी परंपरा पुन्हा चर्चेत आली. या जिल्ह्यात पक्षनिष्ठेपेक्षा सत्तानिष्ठा अधिक प्रभावी राहिल्याचे गेल्या काही दशकांच्या राजकीय इतिहासातून दिसून येते. त्यामुळेच वाकचौरेंचा शिवसेना (ठाकरे गट) ते शिंदे शिवसेना हा प्रवास अपवाद नसून जिल्ह्याच्या राजकीय संस्कृतीचाच भाग मानला जात आहे. जिल्ह्यात सहकारी साखर कारखाने, दूध संघ, बाजार समित्या आणि जिल्हा बँकेच्या राजकारणातून अनेक नेते घडले. या नेतृत्वासाठी विचारधारेपेक्षा सत्तेच्या केंद्राशी जवळीक महत्त्वाची ठरली. बदलत्या राजकीय वाऱ्यानुसार पक्षबदल करणे ही जिल्ह्याच्या राजकारणातील स्वीकारलेली बाब बनली. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यात आज भाजपचे वर्चस्व दिसते. या बदलत्या राजकीय प्रवाहासोबतच अनेक दिग्गजांनी आपले राजकीय मुक्काम बदलले. मधुकर पिचड यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप असा प्रवास केला. विखे पाटील यांनी काँग्रेसपासून भाजपपर्यंतची वाटचाल केली. कर्डिले, ढाकणे, पाचपुते, घुले, कोल्हे परिवार, काळे परिवार, राजळे परिवार यांच्याही कारकिर्दीत विविध पक्षांचे टप्पे दिसून येतात. बाळासाहेब थोरात यांच्या राजकारणाची सुरूवात काँग्रेस विरोधात बंडखोरीने अपक्ष निवडणूक लढवून झाली. नंतर ते काँग्रेसवासी झाले. दुसरीकडे, खा. नीलेश लंके, सदाशिव लोखंडे आणि वाकचौरे यांच्या प्रवासाने बदलत्या राजकीय समीकरणांचे प्रतिबिंब दाखवले. वाकचौरे यांनी शिवसेना, काँग्रेस, भाजप, अपक्ष, पुन्हा शिवसेना आणि आता शिंदेंची शिवसेना असा प्रवास केला. त्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे केवळ एका खासदाराच्या पक्षांतराच्या नजरेने पाहण्याऐवजी अहिल्यानगरच्या सत्ताकेंद्रित राजकारणाचा आणखी एक अध्याय म्हणून पाहिले जात आहे. पक्षांतरांची जिल्हा पातळीवरील परंपरा जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत एकापेक्षा अधिक पक्षांत काम केले आहे. बाळासाहेब थोरात (अपक्ष-काँग्रेस), कोल्हे कुटुंब (अपक्ष-काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजप), काळे कुटुंब (काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना-राष्ट्रवादी) मधुकर पिचड (काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजप), राधाकृष्ण विखे पाटील (काँग्रेस-शिवसेना-काँग्रेस-भाजप), बबनराव पाचपुते (जनता दल-अपक्ष-काँग्रेस-रा ष्ट्रवादी-भाजप), ढाकणे परिवार (जनता दल-अपक्ष-भाजप-राष्ट्रवादी), कर्डिले परिवार (अपक्ष-राष्ट्रवादी-भाजप), तनपुरे कुटुंब (अपक्ष-काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजप) नीलेश लंके (शिवसेना-राष्ट्रवादी -अजित पवार गट-शरद पवार गट) आणि भाऊसाहेब वाकचौरे (शिवसेना-काँग्रेस-भा जप-अपक्ष-ठाकरे गट-शिंदेंची शिवसेना) यांचा प्रवास याची साक्ष देतो. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात पक्षांतर हा अपवाद नव्हे तर परंपरेचाच भाग मानला जातो.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर