ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

शिवसेना सत्तासंघर्षावर शुक्रवारीही सुनावणी होणार नाही:असीम सरोदे यांचा SC चा दाखला देत दावा; सुनावणी 4 आठवड्यांनी होण्याचे संकेत

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शिवसेनेच्या सत्तासंघर्षाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुन्हा लांबणीवर टाकण्यात आली. ही सुनावणी परवा म्हणजे शुक्रवारी 23 जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती आहे. पण विधिज्ञ असीम सरोदे यांनी ही सुनावणी शुक्रवारी होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचा दावा केला आहे. कोर्टाने प्रस्तुत प्रकरणात अद्याप कोणतीही तारीख दिली नाही. या प्रकरणी 4 आठवड्यांनंतर एखाद्या दिवशी सुनावणी होईल, असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानामुळे शिवसेना खटल्याची सुनावणी शुक्रवारी होणार किंवा नाही याविषयी साशंकता निर्माण झाली आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वातील खंडपीठापुढे आज शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष व चिन्हाशी संबंधित वादावर सुनावणी होणार होती. हे प्रकरण कोर्टात 37 व्या क्रमांकावर लिस्टेड होते. त्यावर सकाळच्या सत्रात 11.30 वाजता सुनावणी सुरू होऊन ती सलग 2 दिवस चालणे अपेक्षित होते. पण आज अचानक कोर्टापुढे अरावली पर्वतरांगांचे प्रकरण आले. कोर्टाने या प्रकरणावर सुनावणी करण्यासाठी दुपारी 1 ची वेळ निश्चित केली. परिणामी, गत 3 वर्षांपासून कोर्टात खितपत पडलेले सत्तासंघर्षाचे प्रकरण असेच पुढे ढकलण्यात आले. प्रकरणावर 4 आठवड्यांनी होणार सुनावणी -असीम सरोदे यासंबंधीच्या वृत्तानुसार, शिवसेना व राष्ट्रवादीशी संबंधित या प्रकरणावर येत्या शुक्रवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. पण असीम सरोदे यांनी हा दावा जोरकसपणे फेटाळले आहे. तसेच हे प्रकरण सतत लांबणीवर टाकले जात असल्यावर नाराजीही व्यक्त केली आहे. ते म्हणाले, आज सर्वोच्च न्यायालयातील सत्ता संघर्ष सुनावणी पुढे ढकलली जाणार हे मला कालच माहिती असल्याने मी आज दिल्लीला गेलो नव्हतो. शिवसेना सत्तासंघर्ष प्रकरणामध्ये कोणतीही नक्की तारीख दिलेली नाही. कुणीतरी पसरविले की 23 जानेवारी या तारखेला सुनावणी आहे. मला सुद्धा एका कार्यक्रमात असताना हीच काही चॅनेल वरील चुकीची माहिती कळली. परंतु याप्रकरणात कोणतीही तारीख अजून दिलेली नाही. चार आठवड्यांनी कोणतीतरी तारीख होईल. कृपया याची नोंद घ्यावी की तारखेबाबत विनंती ऐकून घेण्यास सुद्धा सुप्रीम कोर्टाने नकार दिला आणि फॉर विक्स असे म्हणून कोर्टाचे कामकाज संपले. त्यामुळे नक्की तारीख व्हायची आहे, असे असीम सरोदे यांनी म्हटले आहे. असीम सरोदे यांच्या या विधानामुळे शिवसेनेच्या पुढील सुनावणीविषयी साशंकता व्यक्त केली आहे. हे ही वाचा… शिवसेना-राष्ट्रवादी पक्षचिन्हाची सुनावणी पुन्हा लांबणीवर:सुप्रीम कोर्ट आता शुक्रवारी करणार फैसला!

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाशी संबंधित शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाच्या वादावरील सर्वोच्च न्यायालयातील महत्त्वाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. आज, 21 जानेवारी रोजी सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी होणार होती, मात्र आता ही सुनावणी येत्या शुक्रवारी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर