ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

रुग्णांची आर्थिक लुट झाल्यास गंभीर परिणाम:शासकीय वैद्यकिय महाविद्यालयातील एमआरआय सेंटर चालकास जिल्हाधिकाऱ्यांनी फटकारले

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील एमआरआय विभागात रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शुक्रवारी ता. २९ जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत सेंटर चालकाला चांगलेच फटकारले. रुग्णांची लुट झाल्यास गंभीर परिणाम होतील असा सज्जड दम त्यांनी दिला. त्यानंतर सेंटर चालकाच्या वरिष्ठांनी माफी मागितल्यानंतर वादावर पडदा पडला. हिंगोली येथील रहिवासी वसंत यांनी त्यांची पत्नी सुवर्णा वाघ यांना बुधवारी ता. २७ एमआरआय करण्यासाठी शासकीय रुग्णालयात आणले होते. यावेळी वाघ यांनी सकाळी ९:३० वाजता एमआरआय कक्षात विचारणा केली असता, त्यांना प्रथम १७०० रुपये भरण्यास सांगण्यात आले. त्यानंतर पुन्हा २१५० रुपयांची मागणी केली तर तिसऱ्यावेळी ६४०० रुपये लागतील असे सांगितले. त्यानुसार त्यांच्याकडून सदर रक्कमही घेण्यात आली. या प्रकारानंतर वाघ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन देऊन रुग्णांची आर्थिक लुट होत असल्याचा आरोप केला. सदर प्रकरण जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी गांभीर्याने घेऊन या प्रकरणात आज तातडीने बैठक घेतली. यावेळी तक्रारदार वाघ यांच्यासह रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल तसेच एमआरआय सेंटरच्या कृष्णा डायग्नोस्टीकचे राज्याचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी गुप्ता यांनी सर्व परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर तक्रारदार वाघ, अधिष्ठाता डॉ. मुंगल यांच्याकडे विचारणा केली. त्यानंतर कृष्णा डायग्नोस्टीकच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी त्यांनी सेंटर चालकाला चांगलेच फटकारले. शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात एमआरआयसाठी आलेल्या रुग्णांची गैरसोय व आर्थिक लुट होता कामा नये. यापुढे असे प्रकार होऊ नये याची दक्षता घ्यावी अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशा शब्दात त्यांनी सज्जड दम दिला. त्यानंतर सेंटर चालकांनी माफी मागितली. यानंतर असे प्रकार होणार नाही असे सांगितले. त्यानंतर या वादावर पडदा पडला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर