ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

उपचारासाठी सर्वतोपरी मदत द्या; दोषींवर कारवाई करा:रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेची आक्रमक भूमिका‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) तथा सर्वोपचार रुग्णालयात पत्नी आजारी पतीला पाठीवर घेऊन उपचारासाठी धावपळ करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बुधवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) प्रणित रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेने आक्रमक पवित्रा घेतला. संबंधित रूग्णावर उपचार करण्यात यावेत व या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागण्या परिषदेतर्फे करण्यात आल्या. मागण्या मान्य न केल्यास रिपाइं स्टाइलने आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे उपरोक्त प्रकार घडत असताना संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेने केला आहे. त्यामुळे रुग्णालयाची रुग्णाप्रती असलेली अनास्था दिसून आली. अशाच प्रकारे रुग्णालयात रुग्णाला नाहक त्रासांना सामोरे जावे लागते. त्यामध्ये रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून उपहारगृह नाही. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांना जादा दराने पैसे खर्च करून भूक भागवावी लागत आहे.एम.आर.आयसाठी रुग्णाकडून दोन हजार रुपये एवढी गरीब रुग्णांना न झेपवणारी रक्कम वसूल करण्यात येते, असे पदाधिकारी म्हणाले. हे शुल्क कमी करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली. निवेदन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.संजय सोनुने यांना सादर करण्यात आले. यावेळी परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा विदर्भ सरचिटणीस ॲड.आकाश गुलाबराव हिवराळे, सामाजिक कार्यकर्ते शुभम गोळे,सनी उपर्वट, निखिल घरडे आदी मोठ्या उपस्थित होते. या केल्या मागण्या… खाजगी रुग्णालयात नोकरी करणाऱ्या निवासी डॉक्टरांवर कार्यवाही करण्यात यावी. रुग्णालयात पूर्ण वेळ डॉक्टरांची रुग्णालयात नियुक्ती करण्यात यावी. खाजगी रुग्णालय चालवणाऱ्या डॉक्टर यांना नियुक्ती देऊ नये. रुग्णाच्या वॉर्डमध्ये स्वच्छता ठेवण्यात यावी. कर्मचाऱ्यांनी रुग्णाच्या नातेवाईक यांच्याशी गैर वर्तणूक करू नये.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर