ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

शिक्षण, आरोग्य, सामाजिक न्याय यावर समाजाची प्रगती अवलंबून- डॉ. इंगळे:ज्येष्ठ नागरिक विचारमंचातर्फे डॉक्टरांचा सन्मान सोहळा उत्साहात‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मानवतेच्या आरोग्यसेवेत मोलाचे योगदान देणाऱ्या चर्मकार समाजातील डॉक्टरांचा सन्मान सोहळा ज्येष्ठ नागरिक विचारमंचातर्फे प्रमिलाताई ओक सभागृहात उत्साहात पार पडला. समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही अपरिहार्य आहेत. समता, बंधुता आणि सामाजिक न्याय ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची मूलतत्त्वे आहेत. जात, धर्म आणि विषमता यापलीकडे जाऊन सर्वसमावेशक व न्यायाधिष्ठित समाज घडवण्यासाठी त्यांच्या विचारांचे आचरण आजच्या काळात अधिक आवश्यक ठरते. शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक न्याय या त्रिसूत्रीवर समाजाची प्रगती अवलंबून आहे, असे प्रतिपादन रायपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. अविनाश इंगळे यांनी याप्रसंगी केले. सोहळ्याचे उद्घाटन सेवा निवृत्त जिल्हा नेत्रशल्य चिकित्सक डॉ. शंकरराव उंबरकर यांच्या हस्ते झाले. प्रारंभी संत रविदास महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. समाजहित, सेवाभाव आणि कर्तव्यनिष्ठा यांचा आदर्श निर्माण करणाऱ्या डॉक्टरांच्या कार्याचा शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. विचारमंचावर ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ, ‘रोसा’ या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विठ्ठलराव दांडगे, आयुर्वेद कन्सल्टंट व योगतज्ज्ञ डॉ. कल्याणी पद्मने, रामागुंडम येथील एचपीसीएल रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री आयरे-गव्हाळे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सेवानिवृत्त उप कुलसचिव प्रल्हाद शेकोकार, स्वागताध्यक्ष प्रा. गजानन पदमने उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक विचारमंचच्या विविध नावीन्यपूर्ण व समाजास प्रेरणा देणाऱ्या उपक्रमांची माहिती प्रास्ताविकाद्वारे प्रल्हाद शेकोकार यांनी दिली. सूत्रसंचालन मधुसूदन गव्हाळे व श्यामली जांभळे यांनी केले. आभार रामभाऊ ताजने यांनी मानले. कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिक विचार मंचाचे राम शेगोकार, पांडुरंग वाडेकर, राम गव्हाळे, जगदेवराव टाले, गजानन पदमने, गणपत शेगोकार, लक्ष्मणराव पदमने, मधुसूदन गव्हाळे, प्रभाकर रेवासकर, श्रीकृष्ण शेगोकार, सारंगधर भटकर, निवृत्ती चिम, काशीनाथ भटकर, रामकृष्ण शेगोकार, गणपत शेगोकार, गजानन काकडे, प्रा. गजानन पदमने आदींनी परिश्रम घेतले. यांचा केला सत्कार कार्यक्रमास विशेष योगदान देणारे प्रा. राहुल शेगोकार, दिनकरराव वानखडे, डॉ. अनिकेत भटकर, डॉ. कांचन शेगोकार, भास्करराव वजीरे, ज्ञानेश पदमने, पांडुरंग चोपडे, डॉ. अप्पासाहेब डामरे, किशोर शेगोकार, वसंत महाराज शेगोकार, गजानन डामरे, ॲड. रवींद्र काकडे, एकनाथ शेगोकार, श्रीकृष्ण डांगे, मधुकर वानेडकर, प्रवीण चोपडे यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक विचारमंचाच्या पदाधिकारी, सदस्यांचे सलाह प्रा. लि. यांच्या वतीने शाल, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन करण्यात आले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर