ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

नव्या युगातील तुकाराम माहित नाहीत:मुंढेंच्या बदलीवर सदाभाऊ खोतांची टोलेबाजी; वक्तव्य चर्चेत; प्रशासनावर पुन्हा प्रश्नचिन्ह

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यातील कडक शिस्तीचे आणि धडाकेबाज कामासाठी ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. अवघ्या आठ दिवसांपूर्वी दिव्यांग विभाग मंत्रालयाच्या सचिवपदावर नियुक्ती झाल्यानंतर त्यांची आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागात बदली करण्यात आली. त्यांच्या 21 वर्षांच्या सेवाकाळात ही 25 वी बदली ठरली असून, या निर्णयामुळे प्रशासनात तसेच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या बदल्यांवर सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना, नांदेड दौऱ्यावर असलेल्या आमदार सदाभाऊ खोत यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. विधीमंडळाच्या अंदाज समितीच्या बैठकीसाठी ते नांदेडमध्ये आले होते. पत्रकारांनी मुंढे यांच्या वारंवार बदल्यांबद्दल विचारले असता खोत यांनी दिलेले उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. माझं घराणं वारकरी संप्रदायाचं आहे. संत तुकाराम महाराजांविषयी मला चांगली माहिती आहे. माझे वडील वारकरी होते, त्यांना अनेक अभंग पाठ होते. पण नव्या युगातील तुकारामांबाबत मला फारशी माहिती नाही, असे वक्तव्य खोत यांनी केले. एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याबद्दल थेट भाष्य करण्याऐवजी त्यांनी असा टोला लगावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, मुंढे यांनी दिव्यांग विभागात अल्पावधीत केलेल्या कामाची दखल घेत त्यांची बदली रद्द करावी, अशी मागणी जोर धरत आहे. नांदेडमध्ये दिव्यांग संघटनांनी राहुल साळवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडले. मुंढे यांची बदली रद्द झाली नाही, तर अंदाज समितीच्या आमदारांना घेराव घालू, असा इशाराही आंदोलकांनी दिला. यापूर्वी मंत्रालयातही या मागणीसाठी आवाज उठवण्यात आला होता. याचदरम्यान, नांदेड दौऱ्यात सदाभाऊ खोत यांनी परिवहन विभागीय कार्यालयाला अचानक भेट दिली. या पाहणीत विभाग नियंत्रक चंद्रकांत वडस्कर अनुपस्थित असल्याचे आढळल्याने खोत संतापले. ठरलेल्या वेळेनंतरही अधिकारी कार्यालयात नसल्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्याच्या रिकाम्या खुर्चीला हार अर्पण आपला निषेध नोंदवण्यासाठी खोत यांनी अधिकाऱ्याच्या रिकाम्या खुर्चीला हार अर्पण केला. तसेच, एसटी कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी पैशांची मागणी केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी परिवहन मंत्र्यांकडे केली आहे. या सर्व घडामोडींमुळे मुंढे यांच्या बदलीसह प्रशासनातील कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर