ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

पाणी साठवण्याच्या खड्ड्यात दोघे बुडाले‎:शेवाळामुळे लक्षात आला नाही प्रकार, खेळताना दोघे घराजवळील खड्ड्यात पडले‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अंथरलेल्या ताडपत्रीवर पाय घसरल्यामुळे दोघे ‎खड्ड्यात पडल्याचा अंदाज‎ खेळताना पाणी साठवण्याच्या खड्ड्यात‎पडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला.‎लातूर शहरातील बोधेनगर परिसरात‎ रविवारी दुपारी ही घटना घडली.‎ मिळालेल्या माहितीनुसार, बोधे नगर‎येथील रामला इंडस्ट्रीजच्या पाठीमागील‎भागात ही घटना घडली. दिव्या नवनाथ‎उबाळे (६) व कार्तिक भरत कांबळे‎(७) अशी दोघा मृतांची नावे अाहेत.‎दुपारी ते दोघे घराशेजारी खेळत होते.‎ अशी उघड झाली घटना‎ रविवार सुटीचा दिवस असल्याने‎ परिसरात दुपारी शुकशुकाट होता.‎दिव्या आणि कार्तिक दोघे‎घराबाहेर खेळत होते. खेळताना‎दोघे खड्ड्यात पडले. त्यामुळे‎लागलीच ही घटना कुणाला‎समजली नाही. बराचवेळ‎होऊनही दोघे घराजवळ दिसत‎नसल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध‎घेतला. त्यावेळी ते खड्ड्यात‎पडल्याचे आढळले. घटनेची‎माहिती मिळताच परिसरातील‎नागरिकांनी तातडीने दोघांना बाहेर‎काढून शासकीय रुग्णालयात‎दाखल केले. मात्र वैद्यकीय‎अधिकाऱ्यांनी तपासणीअंती‎दोघांनाही मृत घोषित केले.‎कुटुंबियांनी आक्रोष केला.‎ इनसाइड स्टोरी‎- टँकर व्यावसायिकास‎ जागा भाडेतत्त्वावर दिली‎ ज्या खड्ड्याने दोन मुलांचा बळी‎घेतला त्या जागेच्या मालकाने‎आपला प्लॉट टँकर व्यावसायिकाला‎भाडेतत्त्वावर दिला आहे. संबंधित‎व्यावसायिकाने प्लॉटमध्ये खड्डा‎खोदून त्यात ताडपत्री अंथरली आहे.‎२० फूट रुंद, २० फूट लांब आणि १५‎फूट खोलीचा खड्डा खोदला आहे. या‎खड्ड्यात बोअरवेलचे पाणी साठवले‎जात होते. खड्ड्यात ७ फूट पाणी‎होते. या पाण्याचा पुरवठा‎वसतिगृहांसह इतर भागात केला जात‎होता. या खड्ड्याला संरक्षक कुंपण‎नाही. तसेच रस्त्यालगत असलेला हा‎खड्डा वाहनांसाठी धोक्याचा आहे.‎ फर्स्ट पर्सन‎ – साखळी करून मुलांना काढले‎ बुडालेल्या मुलाचे वडील खड्ड्याजवळ आरडाओरडा करताना दिसल्याने ‎मदतीसाठी धावलो. मुलांना खड्ड्याबाहेर काढणे एकट्याला शक्य नव्हते. ‎त्यामुळे मी पाच ते सहा जणांना बोलावून घेतले. सर्वांनी एकमेकांच्या हातात हात ‎घेऊन साखळी करून मुलांना बाहेर काढले. दोघांना तातडीने शासकीय ‎रुग्णालयात नेले. – धीरेंद्र जवळगेकर, परिसरातील रहिवासी ‎

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर