ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

तरुणावर चाकूहल्ला; हवेत गोळीबार:असोरिया पेट्रोल पंप परिसरातील घटना; जुन्या वादातून हल्ला झाल्याचा संशय‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नागपुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असोरिया पेट्रोल पंपासमोर एका ३६ वर्षीय तरुणावर चाकूहल्ला करण्यात आला. त्यानंतर त्याच ठिकाणी हवेत गोळीबारही झाल्याची धक्कादायक घटना घडली. हा प्रकार जुन्या वैमनस्यातून घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना शनिवारी (दि. २०) रात्री सुमारे नऊ वाजताच्या सुमारास घडली. शोएब अहमद एजाज अहमद (३६, रा. आझाद कॉलनी, अमरावती) असे जखमी तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी नागपुरी गेट पोलिसांनी तत्काळ तिघांना ताब्यात घेतले आहे. हल्लेखोर आणि जखमी शोएब यांच्यात यापूर्वीपासून जुना वाद असल्याची माहिती समोर आली आहे. याच वादातून शनिवारी रात्री असोरिया पेट्रोल पंपासमोर हल्लेखोरांनी शोएब अहमद याच्यासोबत वाद घातला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. यावेळी हल्लेखोरांनी शोएबच्या पाठीवर चाकूने वार करून त्याला जखमी केले. त्याच दरम्यान घटनास्थळी हवेत गोळीबारही करण्यात आल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त राकेश ओला यांच्यासह डीसीपी शाम घुगे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तेथून रिकामे काडतुस जप्त केले आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर