ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

दिव्य मराठी विशेष:366 आमदारांना मुंबईत मिळणार 1 हजार चौरस फुटांचे आलिशान घर; 42 अन् 29 मजल्यांच्या 2 भव्य टॉवर्सचे काम 2 वर्षांत होणार पूर्ण

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


विधानसभा व विधान परिषद मिळून एकूण ३६६ आमदारांसाठी उभारण्यात येत असलेल्या ‘मनोरा’ आमदार निवासस्थान पुनर्विकास प्रकल्पाला वेग आला आहे. या प्रकल्पाचे सुमारे ४० टक्के काम पूर्ण झाले असून, हरित इमारत तत्त्वावर उभारल्या जाणाऱ्या या इमारतीमध्ये प्रत्येक आमदाराला तब्बल १ हजार चौरस फुटांचे आधुनिक घर मिळणार आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार निवासाचे काम सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “मनोरा’ आमदार निवासाचा प्रकल्प मार्च २०२८ पर्यंत, तर फोर्ट भागातील ऐतिहासिक ‘मॅजेस्टिक’ आमदार निवासाचे काम मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. आमदारांना निवासासाठी मुंबईत आकाशवाणी, जुने विधानभवन, मॅजेस्टिक आणि मनोरा अशी ४ ठिकाणे आहेत. मनोरा इमारत पाडून एल अँड टी कंपनीमार्फत ४२ आणि २९ मजल्यांचे २ हायटेक टॉवर्स उभारले जात आहेत. त्यात ३६८ फ्लॅट्स असतील. ‘मॅजेस्टिक’ निवासस्थानी ७२ खोल्या असतील. पंचतारांकित सोयीसुविधा वैयक्तिक सोयी : प्रत्येक फ्लॅटमध्ये आमदारांसाठी स्वतंत्र निवास, कर्मचारी कक्ष आणि मतदार-अभ्यागतांसाठी बैठकीची सुसज्ज खोली असेल. आधुनिक मनोरंजन व आरोग्य : संकुलात मिनी थिएटर, अत्याधुनिक जिम, बहुउद्देशीय सभागृह, प्रेक्षागृह आणि ग्रंथालय असेल. बिझनेस आणि संस्कृती : व्यवसाय केंद्र , अतिथी कक्ष आणि सांस्कृतिक केंद्राची सोय असेल. भव्य पार्किंग: दोन्ही टॉवर्स मिळून सुमारे ७०० वाहनांसाठी अद्ययावत पोडियम पार्किंगची व्यवस्था आहे. आमदारांना एकाच ठिकाणी सोयीनिशी राहता यावे, यासाठी हा प्रकल्प आखला गेला आहे विधानसभेचे २८८ आणि विधान परिषदेचे ७८ मिळून राज्यातील सर्व ३६६ आमदारांना एकाच ठिकाणी सर्व सोयींनिशी राहता यावे, यासाठी हा प्रकल्प आखला गेला आहे. या प्रकल्पासाठी सुरुवातीला १,७६३ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली होती. त्यानंतर सरकारने विकास शुल्कासाठी अतिरिक्त ५० कोटी ५५ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली. मात्र, दरम्यानच्या काळात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आराखड्यात काही बदल करावे लागल्याने, या प्रकल्पाचा एकूण खर्च आणखी वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर