ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

मारेगाव तालुक्यात पुन्हा वीजतारा चोरीचा धुमाकूळ

3 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सिंधी शिवारातील पाच खांबांवरील तार लंपास; महावितरणचे 60 हजारांचे नुकसान

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

सुरेश पाचभाई | मारेगाव

मारेगाव तालुक्यातील सिंधी शिवारात पुन्हा एकदा वीजतारा चोरीच्या घटनांनी डोके वर काढले असून अज्ञात चोरट्यांनी थेट पाच विद्युत लघुदाब खांबांवरील तार कापून लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या चोरीमुळे महावितरणचे सुमारे 60 हजार रुपयांचे नुकसान झाले असून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याप्रकरणी मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कनिष्ठ अभियंता निलेश रामदास काकडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 30 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्री 12 ते 1 वाजताच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी चारचाकी वाहनाच्या सहाय्याने सिंधी शिवारातील नरेंद्र सपाट व इतर शेतकऱ्यांच्या शेतातील पाच वीज खांबांवरील विद्युत तार कापून चोरी केली.

दि. 12 मे रोजी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता गट क्रमांक 177, 178, 178/1 व 178/2 मधील खांबांवरील तार गायब असल्याचे निदर्शनास आले.ग्रामीण भागात वाढत्या वीजतारा चोरीमुळे महावितरणसमोर मोठे आव्हान उभे राहिले असून या प्रकारामुळे शेतकऱ्यांचा वीजपुरवठा विस्कळीत होत आहे. परिणामी शेतीपंप बंद पडून कृषी कामांवर परिणाम होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, परिसरातील नागरिकांनी वीजतारा चोरी करणाऱ्या टोळीचा तात्काळ बंदोबस्त करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार श्याम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्ता किनाके करीत आहेत

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर