ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

हटवांजरी येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा सामुहीक आत्महत्येचा प्रयत्न

80 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

<<प्रशासना मध्ये उडाली एकच खळबळ>>

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील:– हटवांजरी येथील शेतकऱ्यांच्या धरणासाठी अधिग्रहीत केलेल्या जमिनीवर दिनांक 29एप्रिल 2022 रोज शुक्रवारला शेतकऱ्यांच्या जमिनीवर त्यांना कुठलीही पुर्व सूचना न देता  जेशिपी मशीनच्या साह्याने खोद काम करण्यास सुरुवात केली. त्यामुळे रात्री 10वाजताच्या सुमारास  शेतकऱ्यांनी खोदकाम केलेल्या शेतात जाऊन सामुहीक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

  सन 2009/ 2010 मध्ये हटवांजरी-सराटी शिवारात धरण बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.या धरणासाठी हटवांजरी व सराटी या गावातील सुमारे 24 शेतकऱ्यांची शेतजमीन खरेदी करून अधिग्रहित केल्या गेली आहे. यात शेतकऱ्यांची 30 हेक्टर 82 आर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यासाठी मोबदला म्हणून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 1 लाख 42 हजार 500 रुपये देण्याचे ठरले होते. परंतु शासनाकडून मिळणारी ही रक्कम फारच अल्प स्वरूपाचीअसल्याने हा मोबदला त्यावेळी एकाही शेतकऱ्याने स्वीकारला नाही. व त्यानंतर  संबंधीत शेतकऱ्यांनी संमतीशिवाय जमिनीचे हस्तांतरण करण्यात येऊ नये अशा प्रकारची न्यायालयाला विनंती केली.
जिल्हाधिकारी यवतमाळ यांनाही निवेदन देऊन कैफियत मांडल्याची माहीती असुन जोपर्यंत नवीन दराने मोबदला मिळत नाही तोपर्यंत जमीनीचे हस्तांतरण करण्यात येऊ नये अशी विनंती केली आहे.



  या अन्याया विरोधात  ललिता उरकुडे,गणेश जुनगरी,बाबा भोयर, विलास वासाडे,नीलकंठ कालेकर, रामराव वासाडे, संभाशिव लांडे, विनोद वासाडे, वसंता वासाडे, सुमित्रा लांडे, पुरुषोत्तम वासाडे या शेतकऱ्यांनी भु. संपादन, पुनर्वसन आणि पुनर्स्थापना प्राधिकरण नागपूर यांचेकडे वाढीव मोबदल्यासाठी न्यायालयात केस दाखल केली आहे.

हे प्रकरण न्याय प्रविष्ठ असतानाच जिल्हा सिंचन विभागाने दिनांक 29 एप्रिल रोजी जेसीपी च्या साहाय्याने खोदकाम सुरू केले. काम सुरू झाल्याचे कळताच हे सर्व शेतकरी 29 एप्रिल चे रात्री 10 वाजता सुमारास धरणाचे खोदकाम सुरू असलेल्या ठिकाणी शिवण सगाचा झाडाला गळसफास घेऊन सामुहीक आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतानाच गावात आरडाओरड झाल्याने गावातील उपस्थित लोकांच्या लक्षात हा प्रकार येताच पोलिसांना काही स्थानिक नागरिकांनी माहिती दिली माहिती मिळताच मारेगांव पोलीस घटनस्थळी दाखल झाल्या मुळे या शेतकऱ्यांना वाचविण्यात आले.आणि याची तात्काळ माहिती प्रशासनाला देण्यात आली.या घटनेने प्रशासनात एकच खळबळ निर्माण झाली आहे. यावेळी ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनात पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर