ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

ओमराजे हा भंपक माणूस, नावातील ‘राजे’ शब्द काढा:शिंदे गट म्हणजे शहांचे ‘टेस्ट ट्यूब बेबी, ऑपरेशन टायगर’ नाही आमचे कोल्हे पळाले- संजय राऊत

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


ओमराजे हा भंपक माणूस आहे. त्यांच्या नावातील राजे शब्द काढावा असे आमचे चंदनशिवे म्हणाले. ओमराजेचे भाषण ऐका ते कबुल करतात की ते संकटात असताना उद्धव ठाकरेंनी मला आमदार-खासदार केले मी त्यांची साथ कधीच सोडणार नाही. मी जर त्यांना सोडले तर धाराशिवच्या जनतेने मला जोड्याने मारावे, असे म्हणणारा हा माणूस आहे, असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार राऊत यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणाले की, लोकसभेला आमच्या 10 जागा निवडून आल्या होत्या त्यापैकी एक जागा एकनाथ शिंदेंनी चोरीली. त्यांनी वंदना सुर्यवंशी यांना फोन करत निर्णय जाहीर करण्याचे आदेश दिले. ती बाईसुद्धा दलाल होती तिने आदेश ऐकला, नाहीतर ती जागा आमचा होती. ती बाई शिंदेंची दलाल होती, तिच्यावर नंतर अनेक आरोप झाले, कारवाई झाले हे सर्वांनी पाहिले आहे. शेणातील किडे हे शेणात गेले, त्यांच्यावर बोलून काय फायदा नाही. शिंदे आणि त्यांचे लोकं बाडगे आहेत. एकनाथ शिंदे काय यशवंतराव चव्हाण आहेत का? संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे काय यशवंतराव चव्हाण आहेत का? ते केवळ एक उपमुख्यमंत्री आहेत उद्या असतील की नाही सांगता येत नाही. ठेकेदारांकडून आलेल्या पैशावर माणसं विकत घेण्याची त्यांची क्षमता उद्या असेल का नाही हे सांगता येत नाही. अजित पवारांची ही ताकद एकेकाळी होती पण माणूस आज आहे, उद्या नाही. बाळासाहेब ठाकरेंनी पदाचा 3 वेळा राजीनामा दिला होता. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत आम्ही त्यांना राजीनामा देऊ देणार नाही. शिंदे गटाचे आई-बाप अमित शहा संजय राऊत म्हणाले की, कालच्या कार्यक्रमात मी भाषण करणारच होतो पण वेळ झाल्याने मी भाषण केले नाही. शिवसेनेचे दोन वर्धापनदिन कसे असू शकतात. ज्या गटाची स्थापना 4 वर्षांपूर्वी झाली ते शहा यांचे टेस्ट ट्यूब बेबी आहे त्यांना 60 वर्षांचे प्रमाणपत्र कसे देऊ शकतात. हा कसला चमत्कार आहे, शिंदे गटाचे आई-बाप अमित शहा आहेत. त्यांचा डीएनए काढावा लागेल.आम्हाला कार्यक्रमासाठी माणसं बोलावून आणावी लागली नाहीत. आमचे 6 कोल्हे पळाले संजय राऊत म्हणाले की, 6 खासदारांनी ठाकरे गट सोडला हे काही ऑपरेशन टायगर नाही. आमच्याकडचे 6 कोल्हे पळाले त्यांची सुंता केली आहे. टायगर सर्व आमच्यासोबत आहेत. काही लोकांनी स्वत:ला बाजारात विक्रीसाठी उभे केले, एकनाथ शिंदे यांच्याकडे पैसा आहे त्यांनी यांना विकत घेतले. शिंदेंकडे मोठ्या प्रमाणात पैसा आहे त्यांनी खासदार विकत घेतले यामध्ये कसले आले ऑपरेशन घंटा हे सर्व जण शिंदेंच्या दारी घंटा वाजवत बसतील. आता राजकारणात श्वास घेणं खूप अवघड झाले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर