ब्रेकिंग न्यूज
⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News
SP News Maregaon

नागपूर जिल्हा परिषदेच्या ‘प्रोजेक्ट ड्रिम’ची देशपातळीवर दखल:ज्ञानरथाच्या माध्यमातून शैक्षणिक जागरूकतेचा अनोखा संदेश

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नागपूर जिल्हा परिषदेच्या ‘प्रोजेक्ट ड्रिम’ उपक्रमाची दखल भारतीय टपाल विभागाने घेतली आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वाढवण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. टपाल विभाग आणि जिल्हा परिषद नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमावर आधारित एका विशेष वाहतूक कव्हरचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. या ऐतिहासिक उपक्रमाची सुरुवात नागपूरच्या शंकर नगर टपाल कार्यालयातून झाली. नागपूर विभागाचे सहाय्यक संचालक डाक सेवा अतुल काळे यांनी हे विशेष कव्हर्स महिला पोस्टमन कु. प्राची वाघमारे यांच्याकडे सुपूर्द करून या विशेष वाहतुकीचा शुभारंभ केला. यानंतर, ज्ञानाचा प्रसार आणि शैक्षणिक जागरूकतेचा संदेश देणारा जिल्हा परिषदेचा खास “ज्ञानरथ” रस्त्यावर धावला. शंकर नगर टपाल कार्यालयापासून निघालेला हा ज्ञानरथ जिल्हा परिषद नागपूर कार्यालयात पोहोचल्यानंतर, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्या हस्ते या विशेष वाहतूक कव्हरचे औपचारिक प्रकाशन करण्यात आले. एखाद्या शासकीय लोककल्याणकारी प्रकल्पाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषद आणि भारतीय टपाल विभागाने एकत्र येण्याची नागपूरमधील ही पहिलीच वेळ आहे. केवळ नागपूरच नव्हे, तर संपूर्ण देशात अशा प्रकारचा समन्वय आणि सहकार्य अभिनव मानले जात आहे.

या सोहळ्याला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपील काळोडे, उपशिक्षणाधिकारी निखिल भुयार, शिक्षणाधिकारी निलेश गुंड, मुख्यमंत्री फेलो वेदांत पाठक, नागपूर जीपीओचे वरिष्ठ पोस्टमास्तर सुजितकुमार लांडगे यांच्यासह टपाल विभाग व जिल्हा परिषदेचे अनेक वरिष्ठ अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्ञानरथातून प्रवास करून आलेले हे विशेष कव्हर फिलाटेलिस्ट (तिकीट संग्रहक), टपालप्रेमी, विद्यार्थी आणि नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. या उपक्रमाला संपूर्ण जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर