ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

कोंडाईबारी घाटात भीषण अपघात:रस्त्यावर उभ्या असलेल्या बसला भरधाव कंटेनरची धडक, 15 प्रवासी होते, 8 जखमी

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात पोलिस चौकीजवळ महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या बसला मागून भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली. बसच्या समोर आधीच एक ट्रक उभा असल्याने दोन्ही ट्रकांच्या मधोमध बस अक्षरशः चिरडली गेली. अपघात इतका भीषण होता की कंटेनरच्या जबर धडकेत बस कॅबिन चेंदामेंदा झाली, तर ट्रकचा अँगल थेट बसमध्ये घुसल्याने बसचा संपूर्ण पुढील भाग उद्ध्वस्त झाला. बसचे लोखंडी भाग वाकडे-तिडके होऊन दृश्य अंगावर काटा आणणारे होते. या अपघातात नवापूर आगाराची बस क्रमांक एम एच 14 एम एच 1957 चे चालक महेंद्र लाजा गावित (रा. जामनपाडा, ता. नवापूर) यांच्या केबिनमध्ये पाय अडकले होते. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत मोठ्या प्रयत्नाने त्यांना बसमधून बाहेर काढले. अपघाताचे फोटो… बस वाहक संतोष बारसू सोंडे (रा. टाकळी, ता. भुसावळ) यांना पाय व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. जामनपाडा सरपंच प्रियंका जयवंत गावित यांचे बंधु मनोहर गावित यांनी आपल्या खासगी वाहनातून जखमींना तातडीने विसरवाडी रुग्णालयात दाखल करून माणुसकीचा आदर्श घडवला. या बसमध्ये एकूण १५ प्रवासी होते. त्यामध्ये नवापूर तालुका, चिंचपाडा, नवापूर शहर, साक्री तालुका तसेच सुरत, दहिवेल येथील प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. बहुतांश प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णतः विस्कळीत झाली होती. घटनेचा पुढील विसरवाडी पोलिस तपास सुरू आहे. अपघातात जखमी प्रवाशांची नावे –

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर