ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

शेअर मार्केटमध्ये 1 कोटी बुडाले:नंदुरबारच्या शिक्षकाने पोटच्या 2 मुलांसह पत्नीलाही पाजलं विष, नंतर स्वत:ही केली आत्महत्या

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात कार्यरत असलेल्या एका प्राथमिक शिक्षकाने पत्नी आणि दोन लहान मुलांची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील हत्तीद या मूळ गावी ही दुर्दैवी घटना घडली असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कुटुंबीयांचा मृत्यू झाल्यानंतर शिक्षकानेही घेतला गळफास मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षक तळोदा तालुक्यात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. शाळांना सुट्टी असल्याने ते पत्नी आणि दोन मुलांसह आपल्या मूळ गावी आले होते. याच दरम्यान त्यांनी कुटुंबातील सदस्यांना आईस्क्रीममधून विष दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यानंतर पत्नी आणि दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. कुटुंबीयांचा मृत्यू झाल्यानंतर शिक्षकानेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. शेअर मार्केटमधील कोट्यवधींच्या तोट्याने संसार उद्ध्वस्त प्राथमिक तपासात संबंधित शिक्षकाला शेअर मार्केटमध्ये एक कोटी रुपयांहून अधिक आर्थिक फटका बसल्याची माहिती समोर येत आहे. आर्थिक संकट आणि मानसिक तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे. नेमके कारण काय होते, विषप्रयोग कसा करण्यात आला आणि आर्थिक नुकसानीचा या घटनेशी किती संबंध आहे, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार ही घटना आर्थिक तणावातून घडल्याची शक्यता वर्तवली जात असली तरी अधिकृत तपास अहवालानंतरच संपूर्ण सत्य समोर येणार आहे. ‘मदतीचा’ फज्जा!:लातूरच्या शेतकऱ्याला दिलेला बैल निघाला आजारी; रोहित पवार-वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, प्रशासनाकडून बैल बदलण्याची तयारी लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्या मदतीसाठी शासनाने दिलेला बैलच आजारी निघाल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. पत्नीला नांगराला जुंपून शेतीची मशागत करणाऱ्या या शेतकरी दांपत्याचा व्हिडिओ राज्यभर चर्चेत आल्यानंतर प्रशासनाने तातडीने मदत म्हणून बैल उपलब्ध करून दिला होता. मात्र, हा बैल दोनच दिवसांत आजारी पडल्याने विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे. सविस्तर वाचा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर