ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

जळगावच्या सराफा दुकानातील कचऱ्याचे दर 20 हजारांनी वाढले:एका काेठीभर कचऱ्याला मिळताेय 70 हजार रुपये वार्षिक माेबदला

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सोन्याच्या दराने नवनवीन शिखरे गाठलेली असतानाच, सुवर्णनगरी जळगावच्या सराफा बाजारात एक थक्क करणारी आर्थिक तेजी पाहायला मिळत आहे. इथे केवळ सोन्यालाच नाही, तर दागिने घडवणाऱ्या तब्बल १० हजार कारागिरांच्या घरातील कचऱ्यालाही सोन्याचे मोल आले आहे. यंदा या कचऱ्याच्या किमतीत ४० टक्क्यांनी वाढ झाली असून, ५० किलो क्षमता असलेल्या एका कोठीसाठी व्यापाऱ्यांकडून कारागिरांना वर्षाकाठी तब्बल ७० हजार रुपये मिळत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात २० हजारांची वाढ झाली आहे. गुजरातच्या अहमदाबादपासून ते महाराष्ट्रातील सांगली-मलकापूरपर्यंतचे मोठे व्यापारी वर्षभरापूर्वी बुकिंग करून हा कचरा विकत घेण्यासाठी जळगावच्या सुवर्णनगरीत येतात. वर्षाकाठी १२५ टनांपर्यंत कचरा विक्री होत असतो. खरेदीदार प्रक्रिया करून या कचऱ्यातून सोन्याचे कण वेगळे काढून घेतात. कारागिरातर्फे १ किलो सोन्याच्या वीट, लगडपासून दागिने घडवताना १० ग्रॅम सोन्याचे कण कचऱ्यात जातात. यातील मोठे कण ‌जमा होतात तर बारीक तसेच राहतात. झाडू मारून जमा केलेला कचरा ५० ते १०० किलोच्या कोठीत संकलित केला जातो.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर