ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

पुणे विद्यापीठात दहशतवाद विरोधी दिन पाळला:राजीव गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन, हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेतली

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिन’ पाळण्यात आला. या प्रसंगी राजीव गांधी यांना आदरांजली वाहण्यात आली आणि दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली. विद्यापीठाच्या सरस्वती सभागृहात आयोजित या कार्यक्रमात कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, अधिष्ठाता डॉ. प्रभाकर देसाई, डॉ. सदानंद बनसोडे, डॉ. मंडलिक, वित्त व लेखा अधिकारी सीएमए डॉ. चारूशिला गायके, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. तलवारे आणि संचालक व विभागप्रमुख डॉ. विलास आढाव यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहायक कुलसचिव डॉ. अजय ठुबे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या प्रसंगी विविध शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनेही माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना आदरांजली दरम्यान, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनेही माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली. पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीरंगनाना चव्हाण पाटील यांच्या हस्ते राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाला काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना श्रीरंगनाना चव्हाण पाटील यांनी राजीव गांधींच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, “देशाच्या प्रगतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान, संगणकीकरण आणि युवकांना राजकारणात संधी देण्याचे मोठे काम राजीव गांधी यांनी केले. त्यांनी भारताला २१व्या शतकाकडे नेण्याचे स्वप्न पाहिले आणि त्या दिशेने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.” चव्हाण पाटील पुढे म्हणाले, “पंचायतराज व्यवस्था मजबूत करून ग्रामीण भागातील लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी राजीव गांधींनी प्रयत्न केले. दूरसंचार क्रांती, माहिती तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्रात त्यांनी घेतलेल्या निर्णयांचा देशाला मोठा फायदा झाला. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आज भारत जागतिक स्तरावर तंत्रज्ञान क्षेत्रात सक्षमपणे उभा आहे.”

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर