ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

अमित शाहांनी सांगितलं तेच होणार:99.99% लोक शिवसेनेत येतील, तिथे फक्त ‘हम दो हमारे दो’च उरतील- आशिष जैस्वाल

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


6 बंडखोर खासदारांच्या पक्षप्रवेशाने आधीच बॅकफूटवर गेलेल्या ठाकरे गटाची कोंडी करण्यासाठी शिंदे गटाच्या आमदारांनी आता मानसिक दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. “उद्या ९९.९९ टक्के लोक एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होतील. ठाकरे गटात शेवटी फक्त ‘हम दो हमारे दो’ एवढेच लोक उरतील असा खळबळजनक दावा शिंदे गटाचे आमदार आशिष जैस्वाल यांनी केला आहे. “अमित शाहांनी सांगितल्याप्रमाणे देशात एकच शिवसेना असेल!”
माध्यमांशी बोलताना आशिष जैस्वाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या विधानाचा संदर्भ दिला. ते म्हणाले, “अमित शाहा यांनी आधीच स्पष्ट केले होते की, आगामी काळात महाराष्ट्रात एकच शिवसेना असेल आणि ती म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना. सध्या तेच घडत असून ठाकरे गटाचे आमदार, खासदार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने आमच्या पक्षात येत आहेत. लवकरच संपूर्ण पक्ष एकनाथ शिंदेंच्या पाठीशी उभा असलेला दिसेल.” शिंदेंचे संख्याबळ 7 वरून 13
कालच संजय दिना पाटील यांच्यासह ६ खासदारांनी अधिकृत प्रवेश केल्यामुळे संसदेत शिंदेंचे संख्याबळ ७ वरून १३ झाले आहे. हा धक्का ताजा असतानाच आशिष जैस्वाल यांनी थेट ९९.९९ टक्के लोक पक्षात येतील असा दावा केला आहे. हे ही वाचा.. घरात घुसून मारू, सुरक्षा ठेवा नाहीतर बॉम्ब टाकेन!: माझ्या नादाला लागाल तर हॉस्पिटलमध्ये नाहीतर स्मशानात जाल, संजय दिना पाटलांचा ठाकरे गटाला इशारा ठाकरे गटातून कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत आक्रमक आणि हिंसक भाषेचा वापर करत विरोधकांना उघड आव्हान दिले आहे. “माझं ठाकरे गटाच्या सामान्य कार्यकर्त्यांशी वैमनस्य नाही, त्यांच्यामुळेच मी खासदार झालो. पण जर कोणी माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबाकडे वाकड्या नजरेने पाहिले, तर त्यांनी आधी स्वतःचा मेडिक्लेम आणि लाईफ इन्शुरन्स काढून ठेवावा, कारण माझ्या नादाला लागणारे थेट हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील, असा इशारा त्यांनी दिला आहे. सविस्तर वाचा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर