ब्रेकिंग न्यूज
लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO
SP News Maregaon

यवतमाळमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार:विधान परिषदेला अर्ज मागे घेणारे साहेबराव कांबळे शिवसेनेत दाखल, एकनाथ शिंदेंच्या हस्ते प्रवेश

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


यवतमाळ स्थानिक प्राधिकारी विधान परिषद निवडणुकीत ऐनवेळी माघार घेऊन महाविकास आघाडीला मोठा धक्का देणारे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांनी अखेर आज आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेना (शिंदे गट) पक्षात जाहीर प्रवेश केला. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या घडामोडीमुळे यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडले असून महायुतीची ताकद मात्र कमालीची वाढली आहे. यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत साहेबराव कांबळे यांनी पुरेशा संख्याबळाअभावी अचानक आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. त्यांच्या या अनपेक्षित माघारीमुळे महाविकास आघाडीवर निवडणुकीच्या रिंगणातूनच बाहेर पडण्याची नामुष्की ओढावली होती. या नाट्यमय घडामोडींनंतर मविआ नेत्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांच्या निवासस्थानी तातडीची बैठकही पार पडली होती. बंडखोरी आणि फितुरीच्या या पवित्र्यानंतर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या शिफारशीवरून साहेबराव कांबळे यांची काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदावरून आणि पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली होती. शिंदेंच्या उपस्थितीत बांधले शिवबंधन गेल्या काही दिवसांपासून साहेबराव कांबळे हे शिंदे गटात जाणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती. आज त्यावर शिक्कामोर्तब झाले. यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात कांबळे यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसच्या अनेक महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ‘उमेदवारीपेक्षा लोकांचे काम महत्त्वाचे’ – उपमुख्यमंत्री शिंदे साहेबराव कांबळे यांच्या पक्षप्रवेशानंतर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, “विधान परिषदेचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांनी आज अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे यवतमाळ भागात पालकमंत्री संजय राठोड यांच्या हाताला मोठी ताकद मिळेल. साहेबराव यांनी केवळ निवडणुकीपुरता विचार न करता, मतांच्या आकडेवारीतील फरक ओळखला. महायुतीचाच उमेदवार जिंकणार हे स्पष्ट असल्याने, त्यांनी उमेदवारीपेक्षा लोकांचे काम करण्याला प्राधान्य दिले, हा निर्णय मोठा आहे.” उपमुख्यमंत्र्यांनी पुढे बोलताना विश्वास व्यक्त केला की, “या निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व १७ उमेदवार निवडून येतील. जे लोक केवळ मोदींचा विरोध करत आहेत, त्यांना जनता त्यांची जागा दाखवून देईल. साहेबराव कांबळे यांच्या माध्यमातून यवतमाळमधील वीटभट्टीवर काम करणाऱ्या महिलांना आणि कष्टकऱ्यांना न्याय देण्याचे काम शिवसेना करेल.” साहेबराव कांबळे यांच्या या राजकीय कोलांटउडीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेस संघटनात्मक पातळीवर बॅकफूटवर गेली असून, आगामी निवडणुकांमध्ये महायुतीला याचा मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर