ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

उबाठाच्या वर्धापन दिनी खासदार संजय राऊतांना भाषणाची संधी नाही:आदित्य ठाकरेंनीच भोंगा बंद केल्याचा भाजपचा टोला

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वर्धापन दिन सोहळ्यानंतर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात संजय राऊत यांना भाषणाची संधी देण्यात आली नाही, यावरून पक्षातील त्यांचे महत्त्व कमी होत असल्याचा दावा त्यांनी केला. आदित्य ठाकरेंनीच डाव उधळला
नवनाथ बन म्हणाले की, ठाकरे गटाच्या वर्धापन दिन सोहळ्यात भोंगा वाजलाच नाही! जनाब संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे शिवीगाळ आणि वल्गनांची पूर्ण तयारी करून ठेवली होती. मात्र आदित्य ठाकरे यांनीच त्यांचा डाव उधळून लावत राऊत यांना भाषणाची संधी दिली नाही. मंचावर केवळ आदित्य ठाकरेंचा आदेश चालला आणि राऊत हे फक्त मूक प्रेक्षक म्हणून उपस्थित राहिले.” राऊतांची किंमत घटली, अस्वस्थता वाढली
राऊतांच्या पक्षातील स्थानावर बोट ठेवताना भाजप प्रवक्ते पुढे म्हणाले, “ज्यांच्या भाषणाशिवाय दिवस उजाडत नाही, त्या संजय राऊत यांना स्वतःच्या पक्षाच्या वर्धापन दिनातच बाजूला बसवण्याची वेळ आली. यावरून उबाठामधील त्यांची घटती किंमत आणि वाढती अस्वस्थता स्पष्ट होते. कालपर्यंत संपूर्ण पक्षाला रिमोटने चालवण्याचा आव आणणाऱ्या संजय राऊतांचा स्वतःचाच रिमोट आदित्य ठाकरे यांनी काढून घेतल्याचं दिसलं. नवनाथ बन यांचे ट्विट.. आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत सामना?
वर्धापन दिनाच्या या संपूर्ण घडामोडींवरून ठाकरे गटात दोन तट पडल्याचे सांगत बन यांनी शेवटी लिहिले की, “यातून आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत या सामन्यावर आता अधिकृत शिक्कामोर्तब झालं आहे.” ६ खासदारांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रवक्त्यांनी केलेल्या या थेट टिप्पणीमुळे आता ठाकरे गट आणि संजय राऊत यावर काय पलटवार करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे ही वाचा.. दिव्य मराठी एक्सक्लूझिव्ह: रश्मी ठाकरे, संजय राऊतांमुळे ठाकरे गट फुटला का?:शिंदेंच्या एका कॉलमुळे 6 MP बंडखोर; पुढील लक्ष्य 3 MLC, 65 नगरसेवक
उद्धव ठाकरे यांनी 14 जून रोजी मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली. 9 पैकी फक्त 4 खासदार पोहोचले. तेव्हाच पक्षात मोठी फूट पडणार हे निश्चित झाले. 16 जून रोजी 6 खासदार दिल्लीला पोहोचले आणि 17 जून रोजी लोकसभा अध्यक्षांना भेटले. त्याच दिवशी बातम्या आल्या की, संजय दीना पाटील आणि ओमप्रकाश निंबाळकर हे दोन खासदार 18 जून रोजी पुन्हा शिवसेना (उद्धव गट) च्या संसदीय बैठकीत जाऊ शकतात, परंतु सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झूम कॉन्फरन्स कॉलवर सर्व खासदारांशी संवाद साधला आणि ते शिवसेना (शिंदे गट) मध्ये विलीन होण्यास तयार झाले. सविस्तर वाचा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर