ब्रेकिंग न्यूज
श्रावणात श्री क्षेत्र पांडवदेवीत भक्तांची अलोट गर्दी भाजपा मारेगाव शहर सरचिटणीसपदी रविंद्र टोंगे पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा; 15 वर्षीय मुलीसोबत घडणार होतं नको तेच, 15 जणांविरुद्ध गुन्हा पहाटे घराबाहेर पडताच तो मागे लागला; कॉलेजच्या वाटेत अडवलं अन् मुंबईत घडला भयंकर प्रकार IND vs SL Test : बॉलिंगने आग ओकणाऱ्या DSP सिराजचा बॅटिंगमध्ये जलवा; गगनचुंबी सिक्स पाहून श्रीलंका आवाक्, पा… पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी
SP News Maregaon

एमडीड्रग्ससह 4 जणांना गुन्हे शाळेकडून अटक:गुन्हे शाखेची कारवाई लाखोंचा मुद्देमाल जप्त‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


एका चारचाकी वाहनातून एमडी ड्रग्स हा आम्लीपदार्थ वाहून नेणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आर्णी मार्गावर असलेल्या भामराजा गावाजवळील टोल नाक्यावर बुधवारी २० मे रोजी केली. या कारवाईदरम्यान १५ ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि इतर साहित्य असा एकूण ५ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शहजाद खान शम्मी खान, वय ३० वर्ष, रा. इंदीरा नगर यवतमाळ, शेख शाहरुख शेख मेहबुब वय ३० वर्ष, रा. ख्वाजा नगर सोनटक्के प्लॉट जुनी वस्ती अकोला, साजीद उर्फ हत्ती सलीम सायानी, वय ३२ वर्ष, रा. कुंभारपुरा कळंब चौक यवतमाळ आणि अल्तमश खान अमजत खान पठाण, वय २२ वर्ष, रा. उमर फारुख मार्ग वसंतनगर पुसद अशी अटक करण्यात आलेल्या चार आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी सविस्तर असे की, एक कारमधून एमडी ड्रग्ज आर्णीकडून वतमाळकडे घेवून येत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या पथकाने सापळा रचून एम.एच. १४ जी.डी. १५९७ या कारला थांबवून चौकशी केली असता गाडीच्या डॅशबोर्डमध्ये एका पाऊच मध्ये पांढऱ्या रंगाची पावडर आढळुन आली. हे पावडर एमडी नावाचा अंमली पदार्थ असल्याचे सांगीतले. त्यावरुन तो अंमली पदार्थ १५.०७ मिली ग्राम बाजार मुल्य प्रतिग्राम ७८५०० रुपये, रोख २०७३० रुपये तसेच ४ जुने वापरते मोबाईल किंमत ४० हजार रुपये व महिंद्रा कार किमंत ४ लाख रुपये असा एकूण ५ लाख ३९ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन आरोपींवर यापुर्वीही गुन्हे या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेला आरोपी शहजाद खान शम्मी खान यास २००३ मध्ये एम. पी. डी. ए. कायद्याअंतर्गत एक वर्षा करीता स्थानबध्द करण्यात आले होते. तसेच आरोपी साजीद उर्फ हत्ती सलीम सायानी व त्याचे टोळी विरुध्द सन २०२२ मध्ये मकोका कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर