ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

भाजप नेत्यांची वक्तव्य म्हणजे हवेतली पतंगबाजी:वडेट्टीवार यांनी लगावला टोला; महापौर काँग्रेसचा होणार असल्याचा दावा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसची सत्ता येणार असून त्यासाठीचे आवश्यक संख्याबळ जमवल्याचे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज स्पष्ट केले. काँग्रेसचे नगरसेवक भाजपच्या संपर्कात ही भाजप नेत्यांची विधान म्हणजे हवेतील पतंगबाजी असल्याचा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला काँग्रेस पक्षाचा नेता म्हणून चंद्रपुरात काँग्रेसची सत्ता स्थापन करणे आणि तिथला महापौर बसवणे ही आमची प्राथमिकता आहे, त्यासाठी आवश्यक संख्याबळ मिळवल्याचे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. चंद्रपुरात कुणालाही तोडफोड करणे, नगरसेवक पळवणे यासाठी स्कोप नाही. त्यामुळे कोणी काहीही विधान केली तरी काँग्रेसचाच महापौर होणार असे सांगत वडेट्टीवार यांनी भाजपच्या दाव्यातील हवा काढली. भाजपचे नगरसेवक काँग्रेसचाही संपर्कात असल्याचे संकेत वडेट्टीवार यांनी यावेळी दिले. चंद्रपुरात जनतेने काँग्रेसला कौल दिला असल्याने तिथे जनतेला अपेक्षित असा काँग्रेसचा महापौर होणार अस वडेट्टीवार म्हणाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा नगरसेवक निवडून आले आहेत. राज्यात महाविकास आघाडी आल्याने या नगरसेवकांना चंद्रपुरात सोबत घेण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी सांगितले. महापौर पदावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दावा केला, हा त्यांचा अधिकार आहे, सर्वच गोष्टींबाबत शिवसेना पक्षातील पक्षश्रेष्ठींशी चर्चा सुरू असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. चंद्रपुरात काँग्रेस निष्ठावंत आणि अनुभवी नगरसेवक यांना महापौर बनवावे अशी भूमिका आहे. नागपुरात पत्रकारांशी संवाद साधत असताना काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर महापालिकेबाबत भूमिका मांडली. मुंबई-अहमदाबाद हा राष्ट्रीय मार्ग १९ आणि २० जानेवारी रोजी मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला असून याची अधिसूचना पालघर जिल्हाधिकारी यांनी गुजराती भाषेत काढली ही सुरुवात आहे. पालघर पासून गुजरातीचा शिरकाव करण्यात येत आहे. भाजपचा मुंबईत महापौर होणार, म्हणजे कुणाच्या इशाऱ्यावर मुंबई चालणार हे स्पष्ट आहे अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी केली. स्वित्झर्लंड येथील दावोस इथे राज्य सरकारने लाखो कोटींचे सामंजस्य करार करत आहे.पण यात देशातील कंपन्या परदेशात जाऊन करार करत आहे, याचा काय उपयोग आहे? परदेशातील कंपन्यांची महाराष्ट्रात गुंतवणूक येणार का, असा सवाल वडेट्टीवार यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर