ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

खाद्यतेल अभियानात सोयाबीन, भुईमूगची निवड:कृषी योजनांचा जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ द्यावा- जिल्हाधिकारी‎

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पीक विशिष्ट उत्पादन मोहिम व विविध कृषी योजनांबाबत आढावा बैठक बुधवारी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेत झाली. शासनाच्या राष्ट्रीय खाद्य तेल अभियान- तेलबिया, कापूस उत्पादकता अभियान, कडधान्य आत्मनिर्भरता अभियान, कृषी समृद्धी योजना या योजना शेती क्षेत्राच्या व शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण आहेत. त्यांची माहिती सर्वदूर पोहोचवून जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. खाद्यतेल अभियानात अकोला जिल्ह्यात सोयाबीन व भुईमूग पिकांची निवड करण्यात आली आहे. पीक विशिष्ट उत्पादन मोहिमेच्या माध्यमातून विविध अभियान व योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहेत. त्याचा अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळाला पाहिजे. योजनेची माहिती प्रसिद्धी व यशोगाथांच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचावी. लक्ष्यांकानुसार नियोजित कामे गुणवत्तापूर्ण व्हावीत. या माध्यमातून कृषिपूरक उद्योगांना सर्वदूर चालना द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे, कृषी उपसंचालक हरिश देशमुख यांच्यासह सहकार विभाग, लीड बँकेचे प्रतिनिधी, प्रगतीशील शेतकरी उपस्थित होते. कडधान्य आत्मनिर्भर अभियानात एकूण ६२० हे. वर तूर, मूग व उडीद पिकासाठी सलग गट प्रात्यक्षिके अपेक्षित आहेत. या तिन्ही पिकांचे १ हजार ५४० क्विं. (५ वर्षांच्या आतील) प्रमाणित बियाणे वितरण अपेक्षित आहे. ५ वर्षांच्या वरील, परंतु १० वर्षांच्या आतील ३ हजार १२० क्विं. प्रमाणित बियाणे वितरण अपेक्षित आहे. या योजनांची माहिती व लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळवून द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. डॉ. इंगळे यांनी सादरीकरण केले. असा आहे लक्ष्यांक कापूस उत्पादकता अभियानात जिल्ह्यात ६ कोटी ३१ लाख ९२ हजार रु. आर्थिक लक्ष्यांक आहे. सघन लागवड पद्धतीवर विशेष प्रति हे. १८५०० रुपये अनुदान देय आहे. त्याशिवाय बायोबार, कॉटन श्रेडर, प्रशिक्षण आदी बाबींचा समावेश आहे. कृषी समृद्धी योजनेत पायाभूत सुविधांची उभारणी, उत्पादकता वाढ, आर्थिक वृद्धी अपेक्षित आहे. चिया लागवडीचा ३५००, गोदाम प्रकल्पाचा १८, अभ्यास दौऱ्याचा ३५०, बेड मेकर यंत्राचा ३०२, स्पायरल सेपरेटरचा १६२५ व टोकन यंत्राचा ७०० असा ६४९५ लाभार्थी लक्ष्यांक आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर