ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

भटके-विमुक्तांच्या घरगणनेसाठी आठ जिल्ह्यांत “मुशाफिरी यात्रा’

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रतिनिधी |जामखेड शासकीय घरगणनेच्या त्रुटींमुळे भटके-विमुक्त समाजाचे वास्तव चित्र समोर येत नसल्याने, त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि जनजागृतीसाठी उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात व्यापक ‘मुशाफिरी यात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. भटके-विमुक्त नेते तथा नगरसेवक ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पत्रकार परिषदेला ग्रामीण विकास सचिव उमा जाधव, संचालक बापूसाहेब ओव्होळ, संतोष चव्हाण, रेश्मा बागवान, ललिता पवार, भक्ती पवार, कीर्ती पवार, भाविका टिकार, श्रुती थोरात, साहिल जाधव आदी उपस्थित होते. ॲड. डॉ. जाधव यांनी प्रशासकीय त्रुटींवर बोट ठेवले. ते म्हणाले की, भटके-विमुक्त समाजातील नागरिक पाल, कुड किंवा कोपी स्वरूपातील तात्पुरत्या निवाऱ्यात राहतात. मात्र, सध्याच्या शासकीय ऑनलाईन घरगणना प्रक्रियेत अशा निवाऱ्यांसाठी कोणताही स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून दिलेला नाही. त्यामुळे हजारो नागरिक या प्रक्रियेतून वंचित राहत आहेत. भटके-विमुक्त हे या देशाचे नागरिक नाहीत का? त्यांची अचूक घरगणना आणि जनगणना झाली नाही, तर त्यांच्या लोकसंख्येचा आकडा कसा समोर येणार? लोकसंख्याच माहीत नसेल तर त्यांच्या विकासाचे बजेट, कल्याणकारी योजना आणि निधीचे नियोजन सरकार कसे करणार, असे जाधव म्हणाले. उपजीविकेसाठी सतत भटकंती करावी लागत असल्यामुळे या समाजाच्या जनगणनेत मोठ्या अडचणी येतात. संविधानाने दिलेले अन्न, वस्त्र आणि निवारा हे मूलभूत अधिकार भटके-विमुक्तांना मिळावेत यासाठी ही ‘मुशाफिरी यात्रा’ मैलाचा दगड ठरणार आहे. ही यात्रा अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या ८ जिल्ह्यांमध्ये फिरणार आहे. या दौऱ्यात सुमारे ११० गावांना भेटी देऊन भटके-विमुक्त समाजाच्या वस्त्या, पाल आणि वाड्यांवर थेट संवाद साधला जाईल. समाजातील नागरिकांच्या समस्या जाणून घेणे, घरगणना व जनगणनेबाबत त्यांच्यात जागृती निर्माण करणे आणि त्यांच्या मागण्या शासनापर्यंत आक्रमकपणे पोहोचवणे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर