ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

गौतम बुद्धांच्या मानवतावादी विचारानेच जगात शांती नांदू शकते- भंते अलोकदीप:वेरूळ येथील लेणी , बुद्धविहारास नेपाळ भिक्खू संघाची सदिच्छा भेट‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


खुलताबाद तालुक्यातील जगप्रसिद्ध असलेले ऐतिहासिक वेरूळ येथील महामाया बुद्धविहारास व वेरूळ लेणीला नेपाळच्या भिक्खू संघाने नुकतीच सदिच्छा भेट दिली. यावेळी नेपाळचे भंते अलोकदीप यांनी वेरूळ येथे भिक्खू संघासाठी सुविधाजनक निवासस्थान निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी मदत व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी भंते अलोकदीप (नेपाळ), भंते उत्तमा (म्यानमार), भंते आनंद (नेपाळ) यांच्यासह महास्थवीर शांतरक्षित (अमरावती), भंते दीपंकर (बुलढाणा), ज्ञानवती, आभास्वती, धम्म करुणा, धम्मसती यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाची सुरुवात महामाया बुद्धविहाराचे अध्यक्ष विनोद ढिवरे यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर सामूहिक बुद्धवंदना घेऊन उपस्थित उपासक-उपासिकांनी त्रिसरण-पंचशील ग्रहण केले. सर्वप्रथम भिक्खू संघास श्रद्धापूर्वक भोजनदान देण्यात आले. धम्मदेसना देताना भंते अलोकदीप यांनी तथागत गौतम बुद्धांच्या जीवनातील विविध दाखले देत सांगितले की, तथागतांच्या मानवतावादी, करुणा व मैत्रीच्या विचारानेच आजच्या अशांत जगात खरी शांती नांदू शकते. वेरूळसारखे ऐतिहासिक स्थळ धम्म प्रचाराचे जागतिक केंद्र व्हावे. या सोहळ्यास परिसरातील समाज बांधव, उपासक व उपासिका उपस्थित होते. नेपाळ भिक्खू संघाच्या या भेटीमुळे वेरूळ येथील बौद्ध अनुयायांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. निवासस्थान उभारण्यासाठी सहकार्य करू Ãयावेळी बोलताना भंते अलोकदीप म्हणाले, जगविख्यात वेरूळ बुद्ध लेणी पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटकांसह विविध देशांतील भिक्खू संघ नियमितपणे येत असतात. वेरूळ नगरीतील बुद्धविहाराची जागा प्रशस्त आहे. या ठिकाणी भिक्खू संघासाठी सुविधाजनक निवासस्थान निर्माण झाल्यास परदेशातून येणाऱ्या भिक्खूंना वास्तव्यासाठी मोठी मदत होईल. हे निवासस्थान उभारण्यासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू. -भंते अलोकदीप, भिक्खू, नेपाळ संघ

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर