ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

तरुणाची संभाजीनगर ते रायगड 450 कि. मी. पदयात्रा:शिवराज्याभिषेक दिनी रायगडावर पोहोचण्याचा संकल्प‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील आडगांव भोसले येथील ३० ंवर्षीय तरुण शिव एकनाथ शिंदे हा डोक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची पाच कीलो वजनाची मूर्ती घेऊन छत्रपती संभाजीनगर ते किल्ले रायगडपर्यंत ४५० की.मी. पदयात्रा करत आहे. या तरुणाने (२० मे) रोजी छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून आपल्या पायी पदयात्रेचा शुभारंभ केला. शिव शिंदे या यात्रेत छत्रपती संभाजीनगर ते त्र्यंबकेश्वर नाशिक मार्गे किल्ले रायगडकडे जाणार आहे. २० दिवस छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती डोक्यावर घेऊन पायी चालणार आहे. ६ जून रोजी शिवराज्यभिषेक दिनी किल्ले रायगडावर पोहोचण्याचा त्याचा संकल्प आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण अंगीकारावी, गोमातेला राष्ट्रमाता म्हणून सन्मान मिळावा, महिला मुलींचे रक्षण तरुणांनी करावे, तरुणांनी साहसी बनावे, सर्वांनी वृक्षारोपण करून वृक्षाचे संवर्धन करावे, असा संदेश शिव शिंदे या पदयात्रेद्वारे तरुणांना देत आहे. त्याच्या या पदयात्रेत तो बोर दहेगाव येथून नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्गाने जात असतांना बोर दहेगाव येथील ग्रामस्थांनी त्याचा सत्कार केला व पदयात्रेसाठी शुभेच्छा दिल्या.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर