ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

मुंबई – बंगळूर बाह्यवळण मार्गावर अपघात:महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू; वाहन चालकाविरोधात गुन्हा, शोध सुरू

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबई-बंगळूर बाह्यवळण मार्गावर वडगाव पूल परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेत एका महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला आहे. महेश गजानन मानकर (वय २१) असे मृत तरुणाचे नाव आहे. या अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी महेशचा मित्र सर्वेश गजानन शेळके (वय २०, मूळ रा. रेणुकानगर, डाबकी रस्ता, अकोला) याने नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पसार झालेल्या अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश आणि सर्वेश एकाच शिक्षण संस्थेत शिक्षण घेत आहेत. मध्यरात्री एकच्या सुमारास महेश दुचाकीवरून मुंबई-बंगळूर बाह्यवळण मार्गावरून जात असताना, वडगाव पूल परिसरातील शौर्यश्री लॉनसमोर त्याला भरधाव वाहनाने धडक दिली. अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या महेशला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम शेटे यांनी घटनास्थळी भेट दिली असून, पसार झालेल्या वाहनचालकाचा शोध सुरू आहे. पोलीस उपनिरीक्षक एस. पवार या प्रकरणाचा तपास करत आहेत. भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचारी ठार दरम्यान, पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील वाघोली परिसरातही एका भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत ज्येष्ठ नागरिकाची ओळख अद्याप पटलेली नाही. या ज्येष्ठ नागरिकाचे वय अंदाजे ६० वर्षे असून, त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस शिपाई प्रवीण केदार यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, अज्ञात दुचाकीस्वार तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर राघू या प्रकरणाचा तपास करत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर