ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

पुण्यात दोन अपघातांत दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू:येरवडा, लोणी काळभोर भागात चालकांविरोधात गुन्हा दाखल

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुणे शहरात दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या घटना येरवड्यातील गुंजन चित्रपटगृह चौक आणि पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर भागात घडल्या. दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधित वाहनचालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिला अपघात पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील गुंजन चित्रपटगृह चौकात घडला. प्रदीप भीमराव यादव (वय ७६, रा. अक्षय बंगला, सैनिकवाडी, वडगाव शेरी) हे सायकलवरून व्यायामासाठी निघाले असताना एका मोटारीने त्यांना धडक दिली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. यादव यांचा मुलगा शंतनू (वय ४६) यांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. भरधाव मोटारीच्या धडकेने गंभीर जखमी झालेल्या यादव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पसार झालेल्या मोटारचालकाचा शोध सुरू असून, पोलीस उपनिरीक्षक एन. नलावडे या प्रकरणाचा तपास करत आहेत. दुसरा अपघात पुणे-सोलापूर रस्त्यावर लोणी काळभोर भागात घडला. युसूफ करीम शेख (वय ७०, रा. गांधी चौक, दौंड) हे पादचारी म्हणून रस्ता ओलांडत असताना एका भरधाव दुचाकीने त्यांना धडक दिली. यात त्यांचाही मृत्यू झाला. शेख यांचा मुलगा वसीम (वय ४५) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोणी काळभोरमधील कदमवाक वस्ती परिसरात ही घटना घडली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या शेख यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक एस. जाधव पुढील तपास करत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर