ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

राष्ट्रवादीबाबत वक्तव्याचा गैरअर्थ काढला:उपमुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशाचे पालन करणार- मंत्री संजय शिरसाट

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत मी केलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. मला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता. महायुतीत कोणताही वाद निर्माण होईल अशी संधी देऊ नका, असे त्यांनी मला सांगितले आहे. मी त्यांच्या या आदेशाचे तंतोतंत पालन करेन. एकनाथ शिंदे हे आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत, त्यामुळे त्यांनी मला ‘सुनावले’ असा त्याचा अर्थ होत नाही. त्यांनी दिलेला आदेश पाळणे हे माझे कर्तव्य आहे, अशी सावध प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे. यापुढे राष्ट्रवादीबाबत परिस्थितीनुसार बोलेन, पण शिंदे साहेबांना विचारूनच बोलेन, असेही त्यांनी स्पष्ट केले. संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादीचे काही नेते आमच्या संपर्कात असून, त्यांना स्वतःच्या पक्षात कोणत्या नेतृत्वाखाली काम करावे असा प्रश्न पडला आहे; त्यांच्या पक्षात काय चालले आहे हे काही दिवसांतच कळेल, असा दावा केला होता. शिरसाट यांच्या या दोन विधानांमुळे राष्ट्रवादीच्या गोटातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. काही लोकांनी भीतीपोटी इंधनाचा साठा सुरू केला संजय शिरसाट म्हणाले की,सध्या शेतकरी आणि सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेलची अत्यंत गरज आहे. काही ठिकाणी लोकांनी भीतीपोटी इंधनाचा साठा सुरू केला आहे, परंतु तसे करण्याची अजिबात गरज नाही. सरकार यावर पूर्ण नियंत्रण ठेवून असून, टंचाई लवकरच दूर केली जाईल. राऊतांच्या टीकेला किंमत देत नाही संजय शिरसाट म्हणाले की,संजय राऊत यांच्या टीकेला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही. त्यांना आमची होत असलेली प्रगती सहन होत नाही, त्यामुळे त्यांनी आधी स्वतःचा उरलेला पक्ष सांभाळावा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही तालुका पातळीवर पक्ष वाढीचे काम वेगाने करत आहोत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर