ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

शिक्षणाशिवाय जीवनामध्ये प्रगती अशक्य:सेवानिवृत्त राजेश आडे यांचे प्रतिपादन, लोणी येथे नवयुवक पंचशील मंडळाकडून सत्कार‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आपल्याला जीवनात प्रगती साधायची असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला ”शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा मूलमंत्र आणि सर्वसामान्यांसाठी खुली झालेली आरक्षणाची दारे यामुळेच माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातील माणसाला उच्च पदस्थ अधिकारी होण्याची संधी मिळाली, असे प्रतिपादन नुकतेच सेवानिवृत्त झालेले कामगार उपायुक्त राजेश आडे यांनी केले. नवयुवक पंचशील मंडळ, लोणी यांच्या वतीने बुद्ध विहारात आयोजित करण्यात आलेल्या भव्य सत्कार समारंभाला उत्तर देताना ते बोलत होते. लोणी-जवळा हा परिसर माझ्या भावनेशी जुळलेला असून, सेवानिवृत्तीनंतरचे संपूर्ण आयुष्य या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठीच अर्पण करण्याचा संकल्पही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक हेमंतकुमार कांबळे होते. त्यांनी आपल्या भाषणात राजेश आडे यांच्या कार्याचा गौरव केला. “गावातून शिकून मोठ्या पदावर गेलेल्या व्यक्तीने आपल्या गावाकडे, आई-वडिलांकडे आणि समाजातील मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले तर ग्रामीण भागाची प्रगती अधिक सोपी होईल. शिकलेली माणसे अनेकदा गावाकडे वळत नाहीत; परंतु राजेश आडे यांनी आयुष्यभर गावाशी व येथील सुख-दुःखाशी आपली नाळ जोडून ठेवली आहे,” असे कांबळे म्हणाले. तसेच, सुशिक्षित माणसांनी राजकारणात येणे काळाची गरज असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्याचे नेटके सूत्रसंचालन जितेंद्र सोनोने सर यांनी केले. कार्यक्रमाला लोणी गावचे सरपंच अमोल वारंगे, माजी सरपंच वसंत खारोळ, ग्रामपंचायत सदस्य बाळू गायधने, सामाजिक कार्यकर्ते मनोज नागापुरे आणि अमित रामटेके आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रकाश सोनटक्के, प्रवीण सोनटक्के, यशवंत मसादकर आणि गौतम साखरकर यांनी अथक परिश्रम घेतले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर