ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

लोहारा एमआयडीसीत ‘नर्मदा जिनिंग’ला आग:लाखो रुपयांचा कापूस जळून खाक, अग्निशमनच्या जवानांनी मिळवले नियंत्रण‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


येथील लोहारा एमआयडीसी परिसरातील ‘नर्मदा कोटेक्स जिनिंग’मध्ये शॉर्टसर्किटमुळे अचानक भीषण आग लागुन कापूस जळून खाक झाला असून, व्यापाऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. लोहारा एमआयडीसी येथील नर्मदा कोटेक्स जिनिंगमध्ये नेहमीप्रमाणे कामकाज सुरू असताना अचानक शॉर्टसर्किट झाले. शॉर्टसर्किटमुळे उडालेल्या ठिणग्या बाजूलाच ठेवलेल्या कापसाच्या ढिगाऱ्यावर पडल्या आणि पाहता-पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. कापूस अत्यंत ज्वलनशील असल्याने संपूर्ण जिनिंग परिसरात आगीचे लोळ आणि धुराचे साम्राज्य पसरले. यामुळे परिसरात काही काळ अग्निशमन जवानांची कामगिरी कौतुकास्पद ही भीषण आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली. यामध्ये प्रामुख्याने वाहन चालक मनीष पवार, फायरमन रोहीत इमलीकर आणि धनराज मारबदे यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता आगीच्या ज्वालांशी लढा दिला. या जवानांच्या अथक परिश्रमांमुळे जिनिंगमधील उर्वरित साठा आणि आजूबाजूचा परिसर सुरक्षित राहिला. जवानांच्या या कामगिरीचे परिसरात कौतुक होत आहे. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर