ब्रेकिंग न्यूज
⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News
SP News Maregaon

विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे आंदोलन तीव्र, अद्याप तोडगा नाही:पुढच्या टप्प्यात धरणे, मोर्चा; आज द्वारसभा झाली

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी १४ मे पासून श्रृंखलाबद्ध आंदोलन सुरू केले आहे. शासनाने अद्याप या आंदोलनाची दखल न घेतल्याने महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी संघाने येत्या काळात लढा अधिक तीव्र करण्याची तयारी केली आहे. याच क्रमात आज, सोमवारी द्वारसभा घेण्यात आली. शासनाकडून मागण्यांवर ठोस निर्णय होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. आज दुपारच्या सुटीत विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारावर निषेध सभा (द्वारसभा) आयोजित करण्यात आली होती. या सभेला विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांवर शासनाकडून कोणतीही सकारात्मक भूमिका घेतली गेलेली नाही. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कर्मचाऱ्यांनी मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर एकत्र येत शासनाच्या धोरणांचा तीव्र निषेध केला. यावेळी “कर्मचारी एकजुटीचा विजय असो” अशा घोषणांनी संपूर्ण विद्यापीठ परिसर दणाणून सोडला. कर्मचारी संघाचे अध्यक्ष अजय देशमुख आणि महासचिव नरेंद्र घाटोळ यांनी मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा दिला आहे. पुढच्या टप्प्यात धरणे आंदोलन आणि मोर्चाही काढला जाणार आहे. या आंदोलनाच्या निषेध सभेला अधिकारी फोरमचे डॉ. दादाराव चव्हाण आणि मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष मंगेश वरखेडे यांनी उपस्थित राहून कर्मचाऱ्यांच्या या लढ्याला जाहीर पाठिंबा दर्शविला. याशिवाय नागपूर विद्यापीठ टीचर्स असोसिएशननेही या आंदोलनाला यापूर्वीच पाठिंबा जाहीर केला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर