ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

अचलपूरमध्ये तीव्र पाणीटंचाई, काही भागांना टँकरने पाणीपुरवठा:चंद्रभागा धरणातून कमी दाबामुळे मेळघाटच्या पायथ्याशी समस्या

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अचलपूर आणि परतवाडा या जुळ्या शहरांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. चंद्रभागा धरणातून येणाऱ्या पाण्याचा दाब कमी झाल्यामुळे ही समस्या उद्भवली असून, खबरदारीचा उपाय म्हणून नगरपालिकेतर्फे टंचाईग्रस्त भागांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या चंद्रभागा धरणातून येणाऱ्या पाण्याचा दाब प्रचंड कमी झाला आहे. यामुळे अचलपूर शहरातील अनेक भागांचा नियमित पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. जलवाहिनीत कमी दाबाने पाणी येत असल्याने देवगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रातील जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरले जात नाहीत. परिणामी, काही प्रभागांमध्ये अत्यल्प दाबाने पाणीपुरवठा होत आहे, तर काही ठिकाणी दोन ते तीन दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे बंद आहे. या गंभीर परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करत अचलपूर नगरपालिकेने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. ज्या भागांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई आहे, त्या परिसरात टँकर पाठवून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी मुख्याधिकारी धीरज गोहाड, अभियंता मनीष शर्मा, जलसंपदा अभियंता चिरायू मनोहर आणि नगरसेवक राज पाटील यांनी जलसंपदा विभागाशी समन्वय साधला. या अधिकाऱ्यांनी धरणस्थळी आणि देवगाव येथील जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन तांत्रिक अडचणींची पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. पालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पाणी समस्येवर काम सुरू असून, नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. चंद्रभागा धरणातून येणाऱ्या पाण्याचा दाब कमी झाल्यामुळे तात्पुरती पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना कमी त्रास व्हावा यासाठी पालिका प्रयत्नशील असून, ब्राम्हणसभासह इतर भागातील पाणीटंचाईसाठी लवकरच कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल, असे प्रशासनाने म्हटले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर