ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

पुसद शहरातील अतिक्रमणावर बुलडोझर; मोहिमेत दुजाभाव:बड्या व्यवसायिकाचे आयतिक्रमण जसेच असल्याचा आरोप‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शहरातील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. विशेषतः महामार्गावरील अतिक्रमण दूर करण्यावर भर दिला जात आहे. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा गांधी चौक, नेताजी सुभाष चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा फुले चौक तसेच बस स्थानक परिसरातील अतिक्रमणावर बुलडोझर चावण्यात आले आहे. परंतू काही बड्या व्यवसायिकाचे अतिक्रमण हटवण्यात आलेले नाही. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहिमेत दुजाभाव करण्यात आल्याचा आरोप नागरिकाकडून केला जात आहे. ‘दैनिक दिव्य मराठी’ मध्ये अतिक्रमणाविरोधात वारंवार बातमी प्रकाशित करण्यात आली होती हे विशेष:ता पुसद शहरातील रहदारीच्या मार्गावर अतिक्रमणावर कारवाई होत आहे. मात्र शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर अडथळा ठरणारे अतिक्रमण तसेच आहे. काही चौकांत आणि रस्त्यांवरून वाहतुकीस अडथळा होणारी दुकाने, हातगाड्या आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. पोलिस बंदोबस्त कारवाईला प्रारंभ केल्यावरही अतिक्रमण धारक जागा सोडण्यास तयार नाही. अतिक्रमणविरोधी कारवाईसाठी अनेक वेळा ‘दैनिक दिव्य मराठी’ने पाठपुरावा केला होता. त्यावेळी पालिकेने काही प्रमाणात अतिक्रमण हटवले. मात्र काही महिन्यांतच तीच अतिक्रमणे पुन्हा पूर्ववत झाले आहेत. सध्या प्रशासनाच्या पुढाकारामुळे काही भागात अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू आहे. नगरपरिषदेनेही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतल्यास शहरात वाहतूक सुरळीत होईल. नागरिकांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळेल. पोलिस व नगरपालिकेकडून अतिक्रमण हटवण्यासाठी लाखो रुपये खर्च करीत आहे. परंतू काही दिवसानंतर पुन्हा अतिक्रमण होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. परिसरातील अतिक्रमण कायमस्वरूपी हटवण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेत कायमस्वरूपी अतिक्रमण हटल्यास अतिक्रमणामुळे मृत्यू झालेल्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली मिळेल असे जागरूक नागरिकाकडून बोलल्या जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर