ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

देशी कट्टा घेवून फिरणारा एक पोलिसांच्या ताब्यात:सांडवा गावात ग्रामीण पोलिसांची कारवाई‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


देशी बनावटीचा कट्टा सोबत घेवुन फिरणाऱ्याला ग्रामीण पोलिसांनी तालुक्यातील सांडवा येथे अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचा कट्टा जप्त करण्यात आला असून ही कारवाई बुधवार दि. २७ मे रोजीच्या संध्याकाळी करण्यात आली. अटक केलेल्या आरोपीला पुसद न्यायालयामध्ये हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. शेख अतिक शेख रशीद वय २५ वर्ष रा. शिवाजी वार्ड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ग्रामीण पोलिस ठाण्याच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सांडवा परिसरामध्ये एक जण अवैधरित्या देशी बनावटीचा कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना पेट्रोलिंग दरम्यान मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे ग्रामीण पोलिस ठाण्याचे ठाणेदार आशीष चौधरी, सहाय्यक फौजदार शेख मसूद, पोलिस अंमलदार योगेश आळणे, केशव मुंढे, अक्षय मोटे, सुनील देव्हारे, शेख सद्दाम, निकिता यांनी सांडवा परिसरात धाव घेतली. त्यानंतर संशयित तरुणाला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक देशी बनावटीचा १५ हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा आढळून आला होता. त्याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये त्याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले आहे. प्रकरणाचा अधिक तपास ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर