ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

डिझेल टंचाईचा फटका, कांदा लिलाव बेमुदत बंद:लासलगाव व्यापारी असोसिएशनचे बाजार समितीला पत्र, साेमवारपासून निर्णयाची अंमलबजावणी

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


कांदा व इतर शेतीमाल इतरत्र पाठवण्यासाठी ट्रकचालकांना इंधन उपलब्ध होत नसल्यामुळे बाजार समितीमधील कांदा व धान्याचे लिलाव सोमवार (दि. 25) पासून बेमुदत बंद राहणार आहेत. लिलाव ठप्प झाल्यास कांदा दर आणखी घसरणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. व्यापारी असोसिएशनने सोमवारपासून कांदा आणि धान्य लिलावात सहभागी होणार नसल्याचे पत्र बाजार समितीला दिले आहे. आधीच युद्धाच्या परिणामामुळे कांद्याची निर्यात ठप्प झाली आहे, बांगलादेशमध्ये गेल्या एक ते दीड वर्षापासून कांदा जात नाही. उन्हामुळे कांदा खराब होत असून त्यामुळे दर घसरले आहेत. त्यात लिलाव बंद या संकटाची भर पडणार आहे. भाव आणखी कमी होणार सध्या जिल्हाभरात कांद्याला जेमतेम 500 ते 600 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यातच आता लिलाव बंदमुळे दर आणखी खाली येण्याची आहे. 15 हजार क्विंटल आवक लासलगाव बाजार समितीत सध्या रोज दहा ते पंधरा हजार क्विंटल कांद्याची आवक होत आहे. यातील 90 टक्के कांदा हा वाहनातून इतर राज्यांत पाठवला जातो. त्यासाठी वाहने नसल्याने लिलाव बंद करण्यात येत आहेत. ऑर्डर वेळेत पोहोचत नसल्याने सौदे तुटले निफाड तालुक्यात उन्हाचा पारा 43 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेला आहे. अशातच इंधन मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे व्यापारी वर्गाला कांदा इतर ठिकाणी पाठवण्यासाठी गाड्या उपलब्ध होत नाहीत, तसेच घेतलेली ऑर्डर वेळेत पोहोचत नसल्यामुळे अनेक सौदे तुटत आहेत. – प्रवीण कदम, कांदा व्यापारी, लासलगाव

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर