ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

राहुल गांधींची धास्ती सरकारला नाही, काँग्रेसलाच:राऊतांनी इंडिया आघाडीचे लक्तर वेशीवर टांगले, जनतेनं आघाडीला नाकारले- बन

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सरकारने नव्हे तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांची धास्ती घेतली आहे. राहुल गांधी यांची धास्ती सोनिया गांधी यांनी घेतली आहे, भाजपला धास्ती घेण्याची काही गरज नाही. जो पर्यंत राहुल गांधी इंडिआ आघाडीचे नेतृत्व करतील तो पर्यंत काँग्रेसला आणि आघाडीला अच्छे दिन येणार नाही, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, राहुल गांधींकडे जर नेतृत्व असेल तर आपल्याला कधीही यश मिळणार नाही हे इंडिआ आघाडीच्या सर्व नेत्यांना माहिती आहे. म्हणूनच ममता बॅनर्जी, स्टॅलीन, उद्धव ठाकरेंचे नाव पुढे केले जाते. राहुल गांधी स्व:तचे कमकुवत नेतृत्व वेळोवेळी सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. 2009 पासून 2024 पर्यत त्यांचा काहीही उपयोग झाला नाही. महाराष्ट्रात काँग्रेसचे नेतृत्व टिपू सुलतानकडे नवनाथ बन म्हणाले की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देशभरात काँग्रेस खड्ड्यात गेलेली आहे. संजय राऊत त्यांचे लांगुनचालन करत असतात. काँग्रेसला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न राऊतांकडून सुरू आहे ते केवळ राज्यसभेची खासदारकी आपल्याला मिळावी म्हणून हे प्रयत्न राऊतांकडून सुरू आहे.काँग्रेस एकटी राहिली आणि एकत्र झाली तरी त्यांच्यानेतृत्वात निवडणूक जिंकता येऊ शकत नाही. कारण सपकाळांसारखे टिपू सुलतान त्यांच्याकडे बसलेले आहेत. टिपू सुलतानच्या नेतृत्वात महाराष्ट्र काँग्रेसचे काही होणार नाही. ..तर देशात भोपळा मिळेल नवनाथ बन म्हणाले की, इंडिआ आघाडीमध्ये बेबनाव होता तो समोर आणण्याचे काम संजय राऊत यांच्यामाध्यमातून केले जात आहे. राऊतांनी आघाडीची मोट कितीही बांधण्याचा प्रयत्न केला तरी ती बांधली जाणार नाही कारण ही आघाडी काही विचारांवर बांधलेली आघाडी नाही ही केवळ खुर्चीसाठी तयार केलेली आहे. येणाऱ्या काळात आघाडीच्या ठिकऱ्या उडणार आहेत. इंडिया आघाडीमध्ये कोण नेतृत्व करणार हे निश्चित होत नाहीये. राहुल गांधी यांचे नेतृत्व स्वीकारायला कुणी तयार नाही. पश्चिम बंगाल म्हणतंय की ममता बॅनर्जीनी नेतृत्व करावे, काही जण स्टॅलिन यांनी नेतृत्व करावे असे मत मांडले आहे, माझे संजय राऊत यांना आवाहन आहे की उद्धव ठाकरेंचे नेतृत्व पुढे करावे जसे महाराष्ट्रात भोपळा मिळाला तसा देशभरात आघाडीला भोपळा मिळेल. इंडिआ आघाडी केवळ सत्तेसाठीची नवनाथ बन म्हणाले की, इंडिया आघाडीचं अस्तित्व फक्त निवडणुकीपुरतंच आहे. हे सत्तेसाठी एकत्र आलेले लोकं आहेत त्यांचा काहीच अजेंडा नाही. केवळ भाजपला विरोध करण्यासाठी ही सर्व मंडळी एकत्र आली आहेत. देशभरातील जनतेने त्यांना नाकारले आहे. राऊतांनी कितीही लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला तरी ते एकत्र येऊ शकणार नाही. मविआ विधानसभेला एकत्र असताना आम्ही तुम्हाला पराभूत केले आणि बहुमत घेत सत्तेत आलो. तुम्ही 90 जागा लढले आणि 20 जागा जिंकल्या, काँग्रेस, राष्ट्रवादीची हीच परिस्थिती होती. पण आम्हाला जनतेने साथ दिली. तुम्ही कोणाला जरी सोबत घेतले असते तरीही जनतेने आम्हालाच पाठिंबा दिला असता.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर