ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

रविवारी 31 मे रोजी दिसणार आता ‘ब्लू मून’:एकाच आठवड्यात दोन खगोलीय घटना,खगोलप्रेमींना पर्वणी‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


निसर्ग आणि अवकाशाची सफर करणाऱ्या खगोलप्रेमींसाठी मे महिन्याचा शेवट एक अत्यंत दुर्मिळ आणि वेधक अनुभूती घेऊन येत आहे. आता दोन दिवसानंतर, पंचवीस मे रोजी ”शून्य सावली”चा थरारक अनुभव येईल. त्यानंतर ३१ मे रोजी रात्री आकाशात ‘ब्लू मून’ दिसणार आहे. एकाच कॅलेंडर महिन्यात दोन वेळा पौर्णिमा येण्याच्या या अनोख्या खगोलशास्त्रीय घटनेमुळे स्थानिक खगोल अभ्यासकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. खगोलशास्त्राच्या नियमांनुसार, कोणत्याही दोन पौर्णिमांमधील अंतर हे साधारणपणे २९.५ दिवसांचे असते. यामुळे जेव्हा महिन्याची पहिली पौर्णिमा १ किंवा २ तारखेला येते, तेव्हा त्याच महिन्याच्या शेवटी म्हणजेच ३१ तारखेला दुसरी पौर्णिमा येण्याचा योग जुळून येतो. चालू मे महिन्याची पहिली पौर्णिमा १ मे रोजी झाली असून, दुसरी पौर्णिमा ३१ मे रोजी येत आहे. याच दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला जगभरात ‘ब्लू मून’ म्हणून संबोधण्याची प्रथा आहे. फेब्रुवारी महिना २८ किंवा २९ दिवसांचा असल्याने त्यात कधीही ब्लू मून येत नाही, मात्र इतर कोणत्याही महिन्यात हा योग येऊ शकतो. ‘ब्लू मून’ हे केवळ एक नाव आहे. याचा अर्थ ३१ मे रोजी दिसणारा चंद्र निळ्या रंगाचाच असेल असा मुळीच नाही. तो इतर सामान्य पौर्णिमेच्या चंद्रासारखाच पांढरा-सोनेरी आणि चमकदार दिसेल. त्यामुळे नागरिकांनी चंद्रात उगाचच निळेपणा शोधण्याचा प्रयत्न करू नये, असे खगोल अभ्यासकांचे म्हणणे आहे. अवकाशात घडणाऱ्या कोणत्याही मोठ्या घडामोडीकडे आपल्याकडे अनेकदा शुभ-अशुभ किंवा अंधश्रद्धेच्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. परंतु, ही पूर्णपणे एक नैसर्गिक आणि गणितीय खगोलशास्त्रीय घटना आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अपप्रचारावर किंवा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी केले आहे. या दुर्मिळ खगोलीय घटनेचा आनंद सर्वांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले. या घटनेविषयी अधिक माहिती पाहिजे असल्यास ९६३७३८४८१२ वर संपर्क साधावा, असेही विज्ञान परिषदेने कळवले आहे. १५२८ मधील जुनी नोंद आणि १९ वर्षांचे चक्र इतिहासाचा वेध घेतल्यास, ‘ब्लू मून’ची सर्वात पहिली अधिकृत नोंद सन १५२८ मध्ये झाल्याचे आढळते. कधीकधी एकाच वर्षात दोन वेळा ब्लू मून पाहण्याची संधी मिळते. एकाच वर्षात दोनदा ब्लू मून दिसण्याचे हे विशिष्ट चक्र दर १९ वर्षांनी पुनरावृत्ती पावते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर