ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

शेतकऱ्यांच्या वेदना समजून त्यांना सामाजिक आधार देण्याची गरज:यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांचे आवाहन

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रतिनिधी | आर्णी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी लेखक विजयकुमार ठेंगेकर यांच्या समवेत ‘सावित्री: हरणार नाही… लढणार’ या शेतकरी आत्महत्येच्या गंभीर विषयावर आधारित कादंबरीचे प्रकाशन केले. हा प्रकाशन सोहळा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात झाला. या वेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की म्हणाले, यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्यांच्या समस्येमुळे संवेदनशील जिल्हा म्हणून ओळखला जातो. अशा परिस्थितीत साहित्याच्या माध्यमातून समाजाला वास्तवाची जाणीव करून देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘सावित्री: हरणार नाही… लढणार’ ही कादंबरी केवळ एका कुटुंबाची कथा नसून, ती संघर्ष, जिद्द आणि आशेचा संदेश देणारी प्रेरणादायी कलाकृती आहे. समाजातील प्रत्येक घटकाने शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेऊन त्यांना मानसिक व सामाजिक आधार देण्याची गरज आहे. तसेच त्यांनी आर्णी पंचायत समिती येथे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत असलेले लेखक विजयकुमार ठेंगेकर यांच्या सामाजिक जाणिवेचे कौतुक करत, ग्रामीण वास्तव आणि शेतकरी कुटुंबांच्या भावना प्रभावीपणे मांडल्याबद्दल अभिनंदन केले. लेखक विजयकुमार ठेंगेकर यांनी कादंबरीच्या लेखनामागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, शेतकरी आत्महत्यांमुळे उद्ध्वस्त होणाऱ्या कुटुंबांचे वास्तव समाजासमोर आणण्याचा आणि संघर्षातून उभारी घेण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न या कादंबरीतून करण्यात आला आहे. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) जालिंदर आभाळे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) युवराज मेहत्रे व कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या यशाबद्दलआर्णी पंचायत समिती येथे ग्रामपंचायत अधिकारीविजयकुमार ठेंगेकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. आर्णी पं. स. चे ग्रा.पं. अधिकारी विजयकुमार ठेंगेकर यांच्या ‘सावित्री: हरणार नाही… लढणार’ कादंबरीचे प्रकाशन मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्या हस्ते केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर