ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

माहेश्वरी भवनात आजपासून श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन:राजेश कृष्णजी महाराज सांगणार कथा, महिलांची भव्य मंगल कलश यात्रा‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रतिनिधी |अकोला सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यात सदा सक्रिय असणाऱ्या माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने अधिक मासानिमित्त श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानीय माहेश्वरी भवन येथे सोमवार, २५ मे ते रविवार ३१ मेपर्यंत सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत आयोजित भागवत कथेत आंतरराष्ट्रीय प्रवक्ते वृंदावन निवासी राजेश कृष्णाजी महाराज हे आपल्या ओजस्वी वाणीतून संगीतमय भागवत सादर करणार आहेत. कथेच्या प्रारंभ दिनी सोमवार, २५ मे रोजी सकाळी ७ वाजता स्थानीय राणी सती धाम येथून माहेश्वरी भवनपर्यंत महिलांची भव्य मंगल कलश यात्रा निघणार आहे. यानंतर सकाळी ९ वाजता माहेश्वरी भवन येथे संगीतमय भागवत कथा प्रारंभ होणार आहे. मंगळवार, २६ मे रोजी कथेत कुंती चरित्र व सुखदेव परीक्षित मिलन यावर कथा होणार आहे. गुरुवार, २८ मे रोजी राम जन्म व कृष्णजन्म होऊन नंदोत्सव साकारण्यात येणार आहे. या वेळी विहंगम कृष्ण जन्माची झाकी साकार करण्यात येणार आहे. सायंकाळी ७.३० वाजता राधाकृपा मंडळाच्या वतीने भजनांचा कार्यक्रम होणार आहे. शुक्रवार, २९ मे रोजी श्रीकृष्ण बाललीला, गोवर्धन पूजा व छप्पन भोग दर्शन होऊन सुंदर झाकी साकारण्यात येणार आहे. शनिवार, ३० मे रोजी महारास, उद्धव गोपी संवाद व रुक्मिणी विवाह झाकी समवेत सादर करण्यात येणार आहे. संध्याकाळी ७.३० वाजता माहेश्वरी सुंदरकांड समितीच्या वतीने सुंदरकांड सादर करण्यात येणार आहे. रविवार, ३१ मे रोजी सकाळी ९ वाजता सुदामा चरित्र व परीक्षित मोक्ष कथेच्या माध्यमातून कथेची पूर्णाहुती होणार आहे. सुदामा मिलनाची उत्कृष्ट झाकी यावेळी सादर करण्यात येणार आहे. दुपारी २ वाजता होम हवन होऊन कथेची भक्तीभावात सांगता होणार आहे. कथेचे मुख्य यजमान मीना व उमेश टावरी, कृष्णा व किशोर लाहोटी, पोथी यजमान लीला व रमेश मालपाणी, रमा व डॉ. अमरीश खटोड, अनुराधा व आशिष बाहेती, निधी व पंकज कोठारी, अनुसया व कुंजबिहारी जाजू राहणार आहेत.अधिक मास पर्वावर आयोजित या श्रीमद् भागवत कथेचा महिला पुरुष भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्ष वंदना हेडा, सचिव शोभा बियाणी, उपाध्यक्ष मंजू गट्टानी, आरती जाजू, सहसचिव सुनिता हेडा, राधा टावरी, कोषाध्यक्ष अनिता गांधी, सल्लागार हेमा खटोड, शिल्पा चांडक आदींसह महिला मंडळानी केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर