ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

महायुतीची विधान परिषद ‘रणनीती’:नाशिक, संभाजीनगरसाठी शिवसेना, तर पुण्यासाठी राष्ट्रवादीशी चर्चा; भाजप 2020 च्या तुलनेत मित्रपक्षांच्या 3 जागा खेचण्याच्या प्रयत्नात

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


१८ जून रोजी १७ जागांसाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. भाजप २०२० च्या तुलनेत मित्रपक्ष शिवसेना (शिंदेसेना) आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या तीन जागा खेचण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात कदाचित जागांची अदलाबदलही होऊ शकते. नाशिक, संभाजीनगरची जागा शिवसेना तर पुण्याची जागा राष्ट्रवादीकडून मिळवण्यासाठी चर्चा सुरू असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. माध्यम प्रतिनिधींशी बोलताना फडणवीस म्हणाले की, आम्ही एकत्रित बसून यातून मार्ग काढू. अजून मार्ग निघाला नाही, पण मला विश्वास आहे की लवकरच मार्ग निघेल. विशेष म्हणजे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर मतदारसंघावर शिवसेनेने आपला दावा कायम ठेवला असून, पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष असल्याचे दिसते. तरीही मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केले आहे. जागावाटपाच्या फॉर्म्युल्यात भाजप १२ जागांवर लढणार राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, १७ जागांसाठी जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला असा: भाजप : १२ शिवसेना (शिंदेसेना): ०४ राष्ट्रवादी (अजित पवार गट): ०१ जागा भाजपला अहिल्यानगर, सोलापूरच्या जागा हव्यात… जळगाव : मंत्री गुलाबराव पाटील यांचा मुलगा इच्छुक. अमरावती : भाजपचे प्रवीण पोटे, काँग्रेसचे बबलू देशमुख आणि वीरेंद्र जगताप यांनी अर्ज नेले. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गवर राष्ट्रवादी तर शिवसेनेने हिंगोली-परभणीवर लक्ष केंद्रित केले आहे. अजित पवारांचे पुत्र जय पवार लढणार नाहीत जागा वाटपावर शिक्कामोर्तबासाठी लवकरच मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक होईल. हिंगोली-परभणी आणि रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागांवरूनही महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. पुण्यातून जय पवार यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, त्यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर