ब्रेकिंग न्यूज
पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा; 15 वर्षीय मुलीसोबत घडणार होतं नको तेच, 15 जणांविरुद्ध गुन्हा पहाटे घराबाहेर पडताच तो मागे लागला; कॉलेजच्या वाटेत अडवलं अन् मुंबईत घडला भयंकर प्रकार IND vs SL Test : बॉलिंगने आग ओकणाऱ्या DSP सिराजचा बॅटिंगमध्ये जलवा; गगनचुंबी सिक्स पाहून श्रीलंका आवाक्, पा… पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video
SP News Maregaon

वीजपुरवठा सततचा खंडीत, पिकांचे नुकसान:6 तास विनाअडथळा विजेचे ‎आश्वासन; आंदोलन मागे‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सततच्या वीज खंडिततेमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने ढोराळे, इर्ले आणि मानेगाव परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. तडाखेबंद उन्हामुळे आधीच पिके संकटात सापडली असताना, वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे पिकांना पाणी देणे अशक्य होत असल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. याच पार्श्वभूमीवर शेकडो शेतकऱ्यांनी हातात कुलूप घेऊन थेट वैराग येथील महावितरण कार्यालयावर धडक दिली. शेतकऱ्यांनी सांगितले की, गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार वीज खंडित होत असल्याने विहिरी व बोअरवेलवरील पंप बंद पडत आहेत. परिणामी ऊस, भाजीपाला, मका, सोयाबीन तसेच इतर पिकांना वेळेवर पाणी देता येत नसल्याने पिके वाळण्याच्या मार्गावर आहेत. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असून, महावितरणने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या भावना व्यक्त केल्या. वीजपुरवठा तातडीने सुरळीत न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेत लवकरात लवकर वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले. मात्र, केवळ आश्वासनांवर विश्वास ठेवणार नसून प्रत्यक्षात सुधारणा झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी स्पष्ट केली. “पिके वाचवा, शेतकऱ्यांना न्याय द्या आणि अखंड वीजपुरवठा करा,” अशी मागणी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केली. कार्यालयाला कुलूप ठोकण्याच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांशी उपकार्यकारी अभियंता रामकृष्ण डोंगरे आणि सुर्डी डिव्हिजनचे शाखा अभियंता अनुपम ओहाळ यांनी तातडीने चर्चा केली. ग्रामपंचायत सदस्य राहुल खरात, बूथ प्रमुख अमोल शिंदे, पोलिस पाटील सरवदे, माजी सरपंच काकडे उपस्थित होते. शेतकऱ्यांचा वाढता रोष पाहून अधिकाऱ्यांनी मागण्या मान्य करत, तात्काळ उपाययोजना म्हणून सहा तास विनाअडथळा वीज पुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन दिले. अधिकाऱ्यांच्या या ठोस आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. दरम्यान, उपकार्यकारी अभियंता डोंगरे यांनी नागरिकांना शासकीय योजनेअंतर्गत सौर ऊर्जेचा वापर करण्याचे आवाहनही केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर