ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

पतीच्या पार्थिवाजवळ पत्नी दोन दिवस बेशुद्धावस्थेत पडून:जनगणना कर्मचाऱ्यांमुळे मिळाली तत्काळ वैद्यकीय मदत‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जनगणनेच्या कामासाठी गेलेल्या‎कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका वृद्ध‎महिलेला वेळीच वैद्यकिय मदत मिळू शकली.‎ही घटना शहरातील वार्ड क्रमांक १९ मधील ‎‎सर्कल क्रमांक ३ येथे उघडकीस आली. ‎‎प्राथमिक वैद्यकिय अंदाजानुसार दोन‎दिवसांपूर्वी वृद्ध पतीचा मृत्यू झाला व त्या ‎‎धक्क्यामुळे पत्नी त्यांच्याच पार्थिवाजवळ‎बेशुद्ध अवस्थेत पडून होती. योग्य वेळी मदत ‎‎मिळाल्याने तिचा जीव वाचला.‎ जनगणनेचे काम सुरू असताना ब्लॉक‎क्रमांक १५ च्या प्रगणक वैशाली नालसे या ‎‎संबंधित घरात माहिती संकलनासाठी‎पोहोचल्या. त्यांच्यासोबत ब्लॉक क्रमांक १६‎चे प्रगणक मनोज वाकोडे तसेच सुपरवायझर ‎‎केशव पंचारिया हेही उपस्थित होते. या घराचा ‎‎दरवाजा अनेकदा ठोठावून आवाज‎दिल्यानंतरही आतून कोणताही प्रतिसाद‎मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी शेजाऱ्यांकडे ‎‎चौकशी केली. त्या घरात वृद्ध दाम्पत्य एकटेच ‎‎राहत असल्याचे, तसेच आजोबांची प्रकृती ‎‎नेहमीच खालावलेली असल्याचे सांगण्यात ‎‎आले. मात्र त्या घरातील आजी दररोज‎सकाळी फिरायला जात असल्याची माहिती ‎‎शेजाऱ्यांनी दिली. सुरुवातीला दोघे बाहेर गेले ‎‎असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात‎आला. मात्र, घरातील लाईट आणि पंखे सुरू ‎‎असल्याचे प्रगणकांच्या लक्षात आले. त्यामुळे‎संशय अधिक बळावला. त्यांनी खिडकीतून‎घरात डोकावून पाहिले असता समोरचे दृश्य‎अंगावर काटा आणणारे होते. वृद्ध आजोबा‎जमिनीवर निश्चल अवस्थेत पडलेले होते,‎तर त्यांच्या शेजारी वृद्ध पत्नी बेशुद्ध अवस्थेत‎पडून होत्या. घरातून दुर्गंधीही येत होती.‎ यावेळी क्षणाचाही विलंब न करता‎जनगणना कर्मचाऱ्यांनी शेजाऱ्यांना‎मदतीसाठी बोलावले. जवळ राहणाऱ्या‎डॉक्टरांनाही तातडीने घटनास्थळी पाचारण‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली‎असता वृद्ध आजोबांचा सुमारे दोन‎दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.‎पतीची अवस्था पाहून पत्नीला धक्का बसला‎आणि त्या बेशुद्ध पडल्याची शक्यता व्यक्त‎करण्यात आली. त्यानंतर संबंधित वृद्ध‎महिलेला तातडीने एका खासगी‎हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.‎डॉक्टरांच्या माहितीनुसार, त्यांच्या शरीरातील‎पाण्याची पातळी अत्यंत कमी झाली होती‎तसेच ऑक्सिजन लेव्हलही धोकादायकरीत्या घसरली होती. आणखी‎काही तास उशीर झाला असता तर त्यांच्याही‎जीवला धोका होवू शकला असता, असे डॉक्टरांनी‎सांगितले. दरम्यान जनगणना कर्मचाऱ्यांनी‎दाखविलेली सतर्कता, संवेदनशीलता आणि‎माणुसकीमुळे एका वृद्ध महिलेचे प्राण वाचले. या‎घटनेनंतर परिसरातून जनगणना कर्मचाऱ्यांवर‎कौतुकाचा वर्षाव होत आहे.‎ दाम्पत्याचा एक मुलगा परदेशात,‎तर दुसरा नागपुरात राहायला‎ या दाम्पत्याला दोन मुल आहेत. त्यापैकी एक‎मुलगा परदेशात वास्तव्यास असून दुसरा‎नागपुरात राहतो. घटनेची माहिती दोन्ही‎मुलांना देण्यात आली. मृत वृद्धावर‎अंत्यसंस्कार करण्यात आले. अशी माहीती‎मनपाच्या सूत्रांनी दिली आहे.‎

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर