ब्रेकिंग न्यूज
Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Kolhapur: चारित्र्याचा संशय, गाडीवरून जातानाच बिनसलं, पतीनं…, भरदिवसा कोल्हापूरच्या रस्त्यावर थरार Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा …
SP News Maregaon

ईको कार – सिमेंट मिक्सर ट्रकची समोरासमोर धडक:कारमधील 11 जण जागीच ठार, मृतांत 3 महिला; कल्याण – नगर महामार्गावरील घटना

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


कल्याण – अहिल्यानगर महामार्गावर सोमवारी सकाळी ईको कार व सिमेंट मिक्सर ट्रकचा एक भयंकर अपघात झाला आहे. या घटनेत तब्बल 11 प्रवाशी ठार झाले असून, 2 जण गंभीर जखमी झालेत. मृतांत 3 महिलांचा समावेश आहे. या अपघातानंतर घटनास्थळी अंगावर काटा आणणारे दृश्य निर्माण झाले होते. यासंबंधीच्या माहितीनुसार, कल्याण – नगर मार्गावर सोमवारी सकाळी एक ईको कार व सिमेंट मिक्सर ट्रकचा भीषण अपघात झाला. ही धडक एवढी भीषण होती की, त्यात ईको कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. त्यामुळे त्यातील 11 प्रवाशांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. ते जागीच ठार झाले. या घटनेत इतर 2 जणही गंभीर जखमी झालेत. त्यांना लगतच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृतांत 8 पुरुष व 3 महिलांचा समावेश आहे.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ती माहिती महामार्ग पोलिस व स्थानिक टिटवाळा पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर सर्वांनी कारमध्ये अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढले. घटनास्थळी रक्तामांसाचा अक्षरशः सडा पडला होता. नेमकी कशी घडली घटना? प्राथमिक माहितीनुसार, कल्याण – अहिल्यानगर महामार्गावरील गोविली गावालगतच्या रायता पुलावर सकाळी 10.45 च्या सुमारास हा अपघात घडला. अपघातग्रस्त ईको कार कल्याण ते मुरबाड अशी प्रवाशी वाहतूक करते. ती आज सकाळी प्रवाशी घेऊन कल्याणहून मुरबाडच्या दिशेने निघाली होती. अपघात घडला तेव्हा त्यात चालकासह 11 ते 12 जण प्रवास करत होते. या कारला समोरून येणाऱ्या भरधाव वेगातील सिमेंट मिक्सर ट्रकने जोरदार धडक झाली. त्यात कारमधील एकाही व्यक्तीला बाहेर पडण्याची संधी मिळणार नाही. ट्रकच्या धडकेने कारमधील 8 जण जागीच ठार झाले, तर इतर 1 जण गंभीर जखमी झाला. जखमीला उपचारासाठी लगतच्या उल्हासनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. मुरबाडचे तहसीलदार अभिजित देशमुख यांनी ही माहिती दिली. पोलिसांकडून मृत व जखमींची ओळख पटवण्याचा प्रयत्न या भीषण अपघातामध्ये ठार झालेल्या 6 जणांची ओळख आतापर्यंत पटली आहे. उर्वरित 5 जणांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे स्थानिक पोलिसांनी सांगितले आहे. या अपघातामुळे कल्याण – नगर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला केल्यानंतर ही वाहतूक सुरुळीत झाली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर सर्वच मृतदेह पुढील सोपस्कारासाठी सरकारी रुग्णालयात पाठवलेत. मुख्यंमंत्र्यांनी केला शोक व्यक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रीय महामार्ग 61 वर कल्याणजवळ दोन वाहनांची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. स्थानिक प्रशासनाशी आम्ही संपर्कात आहोत, असे ते म्हणालेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर